उल्हासनगरात एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह पालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 09:19 PM2018-10-11T21:19:11+5:302018-10-11T21:22:15+5:30
पालिकेकडून 25 हजाराची दंडात्मक कारवाई
उल्हासनगर : शहरातील खुशालदास फटाका दुकानावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेने संयुक्त कारवाई करून एक टन प्लास्टिक पिशवी जप्त केल्या. पालिकेने 25 हजाराची दंडात्मक कारवाई करून प्लास्टिक पिशव्या बाळगण्यावर कारवाईचे संकेत दिले.
उल्हासनगरात सर्रासपणे प्लास्टिक पिशव्याची विक्री होत आहे. गेल्या आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यापारी व व्यापारी नेत्याची भेट घेऊन प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन केले होते. तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाईचे संकेत दिले होते. कॅम्प नं 4 येथील मुख्य मार्केट मधील खुशाल फटाके दुकानावर सायंकाळी धाड टाकून, एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहे. तसेच 25 हजाराची दंडात्मक कारवाई केली. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केने, एकनाथ पवार यांनी दिले.