ठाण्यात वन-वेच्या नियमाचे सर्रास होते उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:40 AM2021-03-21T04:40:12+5:302021-03-21T04:40:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरातील मुख्य रस्ते एकमार्गी करण्यात आले असले तरी वन-वेचे नियम सर्रास मोडण्याचे प्रकार पाहायला ...

One-way rules were rampant in Thane | ठाण्यात वन-वेच्या नियमाचे सर्रास होते उल्लंघन

ठाण्यात वन-वेच्या नियमाचे सर्रास होते उल्लंघन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शहरातील मुख्य रस्ते एकमार्गी करण्यात आले असले तरी वन-वेचे नियम सर्रास मोडण्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत. अनेक बेजबाबदार वाहनचालक या मार्गर्रून उलट्या दिशेने जातात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे शहरात माजीवडा, नौपाडा, तीन पेट्रोल पंप, गावदेवी, राम मारुती रोड, हरिनिवास सर्कल, खारकर आळी अशा अनेक ठिकाणी मुख्य रस्ते वन-वे करण्यात आले आहेत. या मार्गावर एकाच दिशेने वाहतूक होते. परंतु वाहतूक विभागाचे नियम धाब्यावर बसवून या मार्गावर अनेक वाहनचालक उलट्या दिशेने वाहने दामटतात. याचा नाहक त्रास पादचारी तसेच, इतर वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन गर्दीच्या वेळी वन-वेचे नियम मोडल्याने या रस्त्यांवर वादविवाद व परिणामी वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळते. यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. शहरातील या बेजबाबदार वाहनचालकांना कारवाईचा धाक राहिला नसल्यामुळे सकाळी सायकलिस्ट सायकलिंगसाठी बाहेर पडतात त्यांना याचा त्रास होतो.

------------------------------------------

वन-वेचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. आमच्याकडे कारवाई केल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. जिथे वन वे आहे तिथे पुढे आमचे कर्मचारी कारवाईसाठी थांबलेले असतात. असे प्रकार वाढले असतील तर कडक कारवाई करू.

- बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे

.............

माजीवडा ब्रिजखाली (घोडबंदर मार्गे) वन वे आहे तरीही किती तरी बाईकस्वार कापूरबावडीचा सिग्नल टाळण्यासाठी वसंत विहारवरून डाव्या बाजूला न वळता ठाण्याकरिता या ब्रीजखालून बिंधास्त राँग-वेने येतात. यामुळे रात्रीच्या वेळेस अपघाताची शक्यता आहे. अशीच परिस्थिती ठाण्यातील प्रत्येक वन-वेवर आहे.

- विकास धनावडे, ठाणे

........

राममारुती रोडवरून छत्रपती संभाजीमहाराज रोडवर दिवसभर नोएन्ट्रीमधून तर वाघोळकर हॉस्पिटलला राईट मारून बँक आँफ बडोदाकडे राम मारुती रोडवर नोएन्ट्रीतून, हरिनिवास सर्कलवरून एलबीएस मार्गाने तीन पेट्रोल पंपकडे येणाऱ्या वाहनांची पर्वा न करता वाहनचालक वाहने घुसवतात. अशाच पद्धतीने वाहने पाचपाखाडीला अशा अनेक मागार्वरून उलट्या दिशेने घुसवतात. तसेच, जांभळीनाक्यावरून खारकर आळीत पण बेधडकपणे लोक नोएन्ट्रीमध्ये घुसतात.

- प्रशांत ठोसर

.........

वाचली

Web Title: One-way rules were rampant in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.