दुसऱ्याच्या पत्नीस मेसेज पाठवणाऱ्यास बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:40 AM2021-09-19T04:40:57+5:302021-09-19T04:40:57+5:30

मीरा रोड : येथील एका इसमाने दुसऱ्याच्या पत्नीस पाठवलेल्या मेसेजवरून मंगळवारी चांगलाच राडा झाला. तुझ्या पतीने मला मेसेज का ...

The one who sent the message to the other's wife got angry | दुसऱ्याच्या पत्नीस मेसेज पाठवणाऱ्यास बदडले

दुसऱ्याच्या पत्नीस मेसेज पाठवणाऱ्यास बदडले

Next

मीरा रोड : येथील एका इसमाने दुसऱ्याच्या पत्नीस पाठवलेल्या मेसेजवरून मंगळवारी चांगलाच राडा झाला. तुझ्या पतीने मला मेसेज का पाठवला, असा जाब एका विवाहितेने त्याच्या पत्नीस विचारल्यावरून झालेला हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना भाईंदरमध्ये घडली.

भाईंदर पश्चिमेच्या दीडशे फूट मार्ग, डीमार्टजवळ वालचंद दर्शन ही इमारत आहे. हा परिसर काहीसा उच्चभ्रू वस्तीचा म्हणून ओळखला जातो. पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, या इमारतीच्या बी विंगमध्ये अमित प्रवीणचंद शहा (४१) हे पत्नी तेजल (३६) व दोन मुलांसह राहतात. १४ सप्टेंबर रोजी रात्री ते इमारतीतील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आयोजित भोजन समारंभात जेवण करून इमारतीच्या पाठीमागे फोनवर बोलत होते. बोलता बोलता ते पत्नीसह इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचले. त्यावर ए विंगमध्ये राहणारे अनिल पृथ्वीराज जैन हे त्यांची पत्नी मंजूसह आले व त्यांनी शहा यांना आवाज देऊन थांबण्यास सांगितले. मंजूने तेजलला जाब विचारला की, तुझ्या पतीने माझ्या मोबाइलवर मेसेज का पाठविला, त्यावरून तेजलने कसला मेसेज आहे, मला दाखव असे मंजूला सांगितले. त्यावेळी अनिलने अमितची कॉलर पकडून बाहेर येण्यास सांगितले. यावेळी बाचाबाची होऊन अनिलने शिवीगाळ करून अमितला भिंतीवर ढकलून हेल्मेटने व ठोशाबुक्क्यांनी बेदम चोपले. मंजू व प्रशांत जैन यांनीदेखील अमितला बदडले. मंजू हिने तेजलच्या गालावर चापट लगावली.

इमारतीमधील दोन कुटुंबांतील राडा पाहून अन्य राहिवाशांनी ही मारामारी सोडवली. या मारहाणीत अमितचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून १५ सप्टेंबर रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात अनिल व त्याची पत्नी मंजू जैन आणि प्रशांत जैन या तिघांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The one who sent the message to the other's wife got angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.