खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या इसमाचे कारागृहात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
By नितीन पंडित | Published: November 21, 2022 05:59 PM2022-11-21T17:59:04+5:302022-11-21T17:59:48+5:30
तेव्हा पासून हे दोघे भाऊ न्यायालयीन कोठडीत आहेत.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: भिवंडीत खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेले इफ्तेखार अहमद शेख उर्फ बबलू वय ५१ याचे कल्याण कारागृहात हृदयविकाराच्या धक्क्याने रविवारी निधन झाले आहे .एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद मुख्तार अहमद शेख उर्फ खालिद गुड्डू यांचे ते मोठे बंधू आहेत.
एमआयएम शहराध्यक्ष खालिद गुड्डू व भाऊ इफ्तेखार उर्फ बबलू या दोघांना भिवंडी गुन्हे शाखेने २४ सप्टेंबर २०२० रोजी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली.त्यानंतर विविध पोलीस ठाण्यात खालिद गुड्डू विरोधात तब्बल नऊ खंडणीचे व एक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.तेव्हा पासून हे दोघे भाऊ न्यायालयीन कोठडीत आहेत.
रविवारी बबलू यास उलट्या जुलाब हा त्रास बळावुन त्यातच इफ्तेखार उर्फ बबलू यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने प्रथमोपचार करून त्यांना उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे घोषित केले .दरम्यान मृतदेह मुंबई जे जे रुग्णालयात शवं विच्छेदना साठी घेवुन गेले असून त्यानंतर मृतदेह भिवंडी येथील नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
इफ्तेखार उर्फ बबलू हे मागील काही दिवसांपासून आजारी होते व त्यांच्यावर योग्य उपचार करावेत अशी मागणी भिवंडी न्यायालयात केल्यानंतर न्यायालयाने त्या संदर्भांत कारागृह प्रशासनास योग्य ते उपचार करण्याबाबत आदेश बजावून ही कारागृह प्रशासन व कारागृह वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार करण्यासा हयगय केल्याने इफ्तेखार यांचा मृत्यू झाल्याचा आरोप एमआयएम शहर सरचिटणीस अँड अमोल कांबळे यांनी केला आहे .दरम्यान या दुर्दैवी घटने नंतर शहरात त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यां कडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"