अंबरनाथ केमिकल कंपनीतील स्फोटात एका कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 06:01 PM2023-06-10T18:01:46+5:302023-06-10T18:42:17+5:30

 स्फोटात कंपनीतील एक कामगार मृत्युमुखी पडला असून इतर कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

One worker died in Ambernath Chemical Company oil blast | अंबरनाथ केमिकल कंपनीतील स्फोटात एका कामगाराचा मृत्यू

अंबरनाथ केमिकल कंपनीतील स्फोटात एका कामगाराचा मृत्यू

googlenewsNext

अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिमेकडील वडोल गाव एमआयडीसी क्षेत्रामध्ये ब्ल्यूजेट हेल्थ केअर लिमिटेड या रासायनिक कारखान्यांमध्ये आज दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीतून मोठ्या प्रमाणात विषारी व्हायची गळती सुरू झाली आहे.  स्फोटात कंपनीतील एक कामगार मृत्युमुखी पडला असून इतर कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
    
आज दुपारी अंबरनाथच्या वडोलगाव एमआयडीसी क्षेत्रात एका कंपनीला भीषण स्फोट झाला. या कंपनीत एकूण पाच केमिकल प्लांट असून त्यापैकी दोन नंबरच्या प्लांटमध्ये हा भीषण  स्फोट घडला. त्यानंतर या प्लांटमध्ये आग देखील लागली होती. आग क्षणार्धात विझली असली तरी या स्फोटामुळे कंपनीत असलेल्या केमिकल टाक्यांना गळती लागली आहे. कंपनीत असलेला मोठ्या रासायनिक टँक मधून नायट्रिक ऍसिडची गळती सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास जाणवत आहे.
     
अंबरनाथ अग्निशामक दल, एमआयडीसी अग्निशामक दल, आणि कंपनीतील कामगार एकत्रितपणे ही वायू गळती रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान कंपनीचा झालेला स्फोटात सूर्यकांत झिमान हा कामगार जागीच मृत्यूमुखी पडला असून इतर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या जखमेवर उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: One worker died in Ambernath Chemical Company oil blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.