ठाणे लाेकसभेच्या ४९०६ मतदान यंत्रांची ऑनलाईन पध्दतीने सरमिसळ
By सुरेश लोखंडे | Published: May 10, 2024 05:04 PM2024-05-10T17:04:20+5:302024-05-10T17:05:15+5:30
या ठाणे लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या मीराभाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, ऐरोली,बेलापूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभानिहाय मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. या दाेन हजार ४५३ मतदान केंद्रांवर मतदानासाठी वापरण्यात येणारे चार हजार ९०६ मतदान यंत्र म्हणजे बॅलेट युनिट प्रमाणेच कंट्रोल युनिट, व व्ही. व्ही पॅट मशीनची ऑनलाइन पध्दतीने सरमिसळ आज करण्यात आली. यावेळी केंद्रीय निवडणूक सर्वसाधारण निरीक्षक जे. श्यामला राव, निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्यासह निवडणूक रिंगणातील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या ठाणे लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या मीराभाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, ऐरोली,बेलापूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी या विधानसभा मतदारसंघात तब्बल दाेन हजार ४५३ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या सर्व मतदान केंद्रावर लागणाऱ्या एकूण चार हजार ९०६ बॅलेट युनिट (राखीव - एक हजार २००), कंट्रोल युनिट दाेन हजार ४५३ (राखीव- एक हजार २०) व्ही. व्ही पॅट दाेन हजार ४५३ (राखीव एक हजार १९१) मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सर्व मशिन्सच्या नंबरची आज ऑनलाईन पध्दतीने सरमिसळ उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसमक्ष करण्यात आली.