महिलेची ऑनलाईन फसवणूक, १ लाख १० हजारांचा घातला गंडा
By सदानंद नाईक | Updated: September 4, 2023 16:37 IST2023-09-04T16:35:39+5:302023-09-04T16:37:19+5:30
उल्हासनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

महिलेची ऑनलाईन फसवणूक, १ लाख १० हजारांचा घातला गंडा
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-१, मधूबन चौकात राहणाऱ्या अनिता नारायण केशवानी यांच्या बँक ऑफ बडोदा व आयसीआयसीआय बँकेतून ते व्यवहात करीत असतांना त्यांची अज्ञात इसमाकडून १ लाख १० हजार ९९९ रुपयांने ऑनलाईन फसवणुक झाली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१, टेलिफोन एक्सचेंज, मधूबन चौक परिसरात अनिता नारायण केशवानी ह्या कुटुंबासह राहतात. गुरवारी ३१ ऑगस्ट रोजी बँक ऑफ बडोदा व आयडीआयसीआय बँके सोबत ऑनलाईन व्यवहार करीत असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दोन्ही बँकेच्या खात्यातून एकूण १ लाख १० हजार ९९९ रुपयांची फसवणूक केली. त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर, त्यांनी रविवारी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत.