उल्हासनगरात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची ऑनलाईन फसवणूक
By सदानंद नाईक | Published: April 29, 2023 05:12 PM2023-04-29T17:12:58+5:302023-04-29T17:13:32+5:30
याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : प्राणिता सुतार या तरुणीला व्हाटसअप नंबरवरून एकाने मॅसेज करून पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवून तब्बल ३ लाख १२ हजार ९०० रुपयांने ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथे राहणाऱ्या प्राणिता प्रकाश सुतार या तरुणीला १५ ते २५ मार्च दरम्यान एका अज्ञात इसमाने मोबाईलवर व्हाट्सअप मॅसेज करून पार्ट टाईम नोकरीसाठी व्हिडीओ लाईक, सबक्राईज व ,प्रिपेड टास्क मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे रक्कम भेटेल. असे सांगून तीन लिंक व प्राणिता सुतार यांचा वर्क आयडी बनवून पाठविला. तसेच सुतार यांच्या बँक खाते क्रमांक याबाबतची माहिती घेतली. बँक माहिती घेतल्यानंतर, ऑनलाईन पद्धतीने ३ लाख १२ हजार ९०० रुपये पाठविण्यास भाग पाडले. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे प्राणिता यांच्या लक्षात आल्यावर विठ्ठलवाडी पोलिस ठाणे गाठून सर्व माहिती दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"