KYC अपडेटच्या आड ऑनलाईन फसवणूक; मीरा-भाईंदरमधील घटना
By धीरज परब | Published: April 4, 2023 12:37 PM2023-04-04T12:37:04+5:302023-04-04T14:44:34+5:30
अॅप डाउनलोड केल्या नंतर इसमाने जैन यांना ४९९९ हा कोड क्रमांक टाकल्यानंतर केवायसी अपडेट होईल असे सांगितले.
मीरारोड- अनोळखी व्यक्तीने कॉल करून केवायसी अपडेट करून देतो सांगितल्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट भागात राहणारे ललित जैन यांच्या मोबाईलवर अनोळखी इसमाने कॉल करून तुमचे केवायसी अपडेट केलेले नसून ते करण्यासाठी अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.
अॅप डाउनलोड केल्या नंतर इसमाने जैन यांना ४९९९ हा कोड क्रमांक टाकल्यानंतर केवायसी अपडेट होईल असे सांगितले. जैन यांनी कोड क्रमांक टाकताच तितकी रक्कम त्यांच्या बँक खात्यातून काढली गेली. त्या नंतर इसमाने पैसे परत होतील सांगितल्या नुसार आणखी कोड क्रमांक जैन यांनी टाकले. अश्या प्रकारे जैन यांची ऑनलाईन १ लाख ४९ हजार ४९९ रुपयांना फसवण्यात आले . या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.