‘संवेदन’चे मालिका लेखनाचे ऑनलाइन गुरुकुल होणार सुरू, लेखक शिरीष लाटकर करणार मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 01:20 AM2020-12-12T01:20:45+5:302020-12-12T01:21:24+5:30
Thane News : शिरीष लाटकर हे गेली २० वर्षे मालिका लेखन क्षेत्रात कार्यरत असून, अनेक लोकप्रिय मालिकांसाठी त्यांनी सुमारे बारा हजारांहून अधिक एपिसोड लिहिले आहेत.
ठाणे : अनेकांना खूप चांगलं लिहिता येतं, पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं, तर ते अधिक वाचनीय, श्रवणीय होतं. या आपल्या लेखनशैलीला अधिक परिपूण करून ज्यांना कोणाला मालिका, चित्रपट अशा मनोरंजन क्षेत्रात लेखक म्हणून काम करायचे असेल, त्यांना संवेदन ट्रेनिंग आणि इन्फोटेन्मेंटच्या वतीने १३ डिसेंबरपासून संवेदन मालिका लेखन या विषयात गुरुकुल सुरू करण्यात येणार असून, यात मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर हे स्वत: यात शिकवणार आहेत.
यात मालिकेसाठी कथा कशी निवडली जाते, त्याचा मुख्य प्लॉट सबप्लॉट अशी रचना, कथा विस्ताराच्या पद्धती, कॅरेक्टर आणि त्याचा वेगवेगळ्या रंगछटा फुलवत ते प्रेक्षकांच्या आवडीचं बनविण्यासाठीच्या क्लुप्त्या आणि त्यात कल्पकता कशी आणावी? पटकथा लेखन आणि त्यातील प्रवाह, प्रत्येक कॅरेक्टरच्या दृष्टिकोनातून कथा उलगणे, प्रेक्षकांनी जाहिरातीनंतरचा भाग पाहावा, म्हणून हुक पॉइंट्स, कथेतील नाट्यमय घटना आणि वळणं आकर्षक कशी करावी, मालिका लेखक म्हणून स्वत:ची ओळख कशी निर्माण करावी? याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येकाच्या लिखाणावर वैयक्तिक मार्गदर्शन, तसेच ग्रुप बनवूनही काही सेशन होणार
आहेत.
दर रविवारी सकाळी ११ ते १ यावेळेत लाइव्ह सत्र आणि आठवडाभर सराव असे तीन महिने उपक्रम चालणार आहे. शेवटी चॅनेलचे पदाधिकारी आणि प्रोड्युसर यांच्यासोबत सत्र होणार आहे. लेखनातून पुढे मालिका क्षेत्रात अनेक संधी आहेत. मनोरंजन सृष्टीचा महत्त्वाचा प्राणवायू असणारा लेखक म्हणून घडू इच्छित असाल, तर अधिक माहितीसाठी ८६६८३३६७६८, ७७१५८३०५७४ यावर संपर्क साधावा.