ऑनलाइन, ऑफलाइन वीजबिल येणार भरता, राहुल सोनटक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:58 AM2020-07-05T00:58:10+5:302020-07-05T00:58:42+5:30

पेटीएम, गुगल पे यासारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून बिले भरणा-या ग्राहकांची संख्या मोठी आहे. या माध्यमातून ग्राहकांना हप्त्याने बिल भरता येत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक महावितरणकडे विविध तक्रारी करत आहेत.

Online, offline electricity bills will be paid, Rahul Sontakke | ऑनलाइन, ऑफलाइन वीजबिल येणार भरता, राहुल सोनटक्के

ऑनलाइन, ऑफलाइन वीजबिल येणार भरता, राहुल सोनटक्के

Next

बदलापूर - महावितरणच्या ग्राहकांना आॅनलाइन आणि आॅफलाइन दोन्ही पद्धतीने तीन समान हप्त्यांत जून महिन्यात आलेली वीजबिले भरता येतील, अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल सोनटक्के यांनी शनिवारी दिली. बदलापूर पूर्व उपविभाग महावितरणतर्फे झालेल्या वेबिनारच्या माध्यमातून नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बदलापूरमध्ये ५० टक्क्यांहून अधिक ग्राहक आॅनलाइन पद्धतीने बिले भरतात. मात्र पेटीएम, गुगल पे यासारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून बिले भरणा-या ग्राहकांची संख्या मोठी आहे. या माध्यमातून ग्राहकांना हप्त्याने बिल भरता येत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक महावितरणकडे विविध तक्रारी करत आहेत.

यावर महावितरणने घेतलेल्या वेबिनारमध्ये स्पष्ट सांगितले की, ज्या ग्राहकांना आॅनलाइन पद्धतीने हप्त्याने बिल भरायचे आहे, त्यांनी महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवरूनच अशा पद्धतीने बिल भरता येईल. इतर माध्यमांतून अद्याप ही सुविधा उपलब्ध नाही. तसेच ज्या ग्राहकांना आॅफलाइन पद्धतीने बिल भरायचे आहे, त्यांना महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह शहरात इतरत्र असलेल्या अन्य केंद्रांवरही तीन समान हप्त्यांत बिल भरता येऊ शकेल. यासाठी महावितरणच्या कोणत्याही सक्षम अधिकाºयाची सही किंवा परवानगी घेण्याची गरज नाही. ग्राहकांनी भरलेल्या बिलाची अधिकृत पावती आपल्याजवळ ठेवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. महावितरण ग्राहकांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
यापूर्वी महावितरणने आॅनलाइन सेशन घेतले होते. मात्र, त्याला ग्राहकांचा तितकासा प्रतिसाद न मिळाल्याने महावितरणने झूमच्या माध्यमातून वेबिनार घेऊन ग्राहकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Web Title: Online, offline electricity bills will be paid, Rahul Sontakke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.