कल्याण डोंबिवलीतील एमसीएचआयचे घर खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टल; ९ नोव्हेंबरला होणार शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 05:18 PM2020-11-05T17:18:30+5:302020-11-05T17:18:34+5:30
९ ते १८ नोव्हेंबर ऑनलाईन पोर्टल प्रदर्शन
कल्याण- कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झालेला नाही. गदीऱ् टाळण्यासाठी एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने ऑनलाईन घर खदेरी मायएमसीएचआय डॉट कॉम हे पोर्टल तयार करण्यात आले असल्याची माहिती कल्याण डोंबिवली एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केली आहे.
एमसीएचआय संघटनेच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी विकास जैन, रोहित भोईर, जयेश तिवारी, रोहित दिक्षीत, मिलिंद चव्हाण, अरविंद वरक, दिनेश मेहता आदी उपस्थित होते. एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रॉपर्टी एक्सोचे भव्य आयोजन कल्याणमध्ये केले जाते.
कोरोनाचा प्रादूर्भाव अद्याप कमी झालेला नसल्याने एका ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्याकरीता डिजिटलच्या जमान्यात ऑनलाईन पोर्टल द्वारे घर खरेदीची संधी ग्राहकाना उपलब्ध करुन देण्यासाठी संघटेच्या वतीने ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्याचे रितसर उद्घाटन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी महापौर विनिता राणो, महापलिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी उपस्थित राहणार आहे. हा उद्घाटन सोहळा देखील ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. एमसीएचआयचे हे 1क् वे प्रदर्शन असून कोरोनामुळे ते ऑनलाईन होत आहे अशी माहिती अध्यक्ष शितोळे यांनी दिली आहे.
अध्यक्ष शितोळे यांनी सांगितले की, या ऑनलाईन पोर्टल १०० विकासकांच्या १५० प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे. संघटनेचे सभासद असलेल्या ५० पेक्षा जास्त प्रकल्पधारकांनी घर खरेदी करणा:या स्टॅम्प डय़ूटी शून्य आकारण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. तसेच गृह कर्जावरील दरात सरकारने कपात केली आहे. त्यामुळे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो अशी आपेक्षा आहे. नव्या गृह प्रकल्पात खरेदीवर काय सूट आणि सेवा सुविधा दिल्या जातील याची माहिती पोर्टलवर एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे.मागील दोन महिन्यात घर खरेदीत सुमारे ५० टक्के वाढ झालेली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रत आत्तार्पयत १३ हजार ५०० घरांची विक्री झाली आहे.