उल्हासनगरात ३५ टक्केच भुयारी गटारीचे काम, वर्षभर चालणार रस्ते खोदण्याचे काम? ठेकेदारांना नोटिसा
By सदानंद नाईक | Updated: February 22, 2025 17:27 IST2025-02-22T17:27:18+5:302025-02-22T17:27:39+5:30
Ulhasnagar News: महापालिका क्षेत्रात ४२६ कोटीच्या निधीतून सुरु असलेल्या भुयारी गटारीचे काम ३५ टक्के होऊन ९७ कोटी बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले.

उल्हासनगरात ३५ टक्केच भुयारी गटारीचे काम, वर्षभर चालणार रस्ते खोदण्याचे काम? ठेकेदारांना नोटिसा
- सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिका क्षेत्रात ४२६ कोटीच्या निधीतून सुरु असलेल्या भुयारी गटारीचे काम ३५ टक्के होऊन ९७ कोटी बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले. भुयारी गटार व पाणी पुरावठा वितरण योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी एका वर्षा पेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याने, रस्ते खोदण्याचे काम सुरु राहणार आहे.
उल्हासनगर महापालिका हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून ४२६ कोटीच्या निधीतून भुयारी गटारी योजना, ११० कोटीच्या निधीतून पाणी पुरावठा वितरण योजनेचा दुसरा टप्पा, १५० कोटीच्या निधीतून एमएमआरडीए अंतर्गत एकूण मुख्य ७ रस्त्याचे काम सुरु आहेत. याव्यतिरिक्त महापालिका निधी व राज्य शासनाच्या विशेष सुख सुविधा निधीतून विविध विकास कामे सुरु असून या कामासाठी रस्ते खोदण्यात येत आहेत. खोदलेल्या रस्त्यामुळे शहरांत माती व धुळीचे साम्राज्य निर्माण होईन वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली. तसेच धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आयुक्तानी विकास कामाची पाहणी केली असून मुदत संपलेल्या अर्धवट कामाच्या ठेकेदारांना नोटीसा काढल्या आहेत.
महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. तर अधिकाऱ्यांना ई-प्रणालीनुसार गेल्या काही वर्षाच्या कामाचा अहवाल पाठविण्याचे आदेश दिल्याने, त्यांच्यातही नाराजी पसरली आहे. डम्पिंग ग्राऊंड, डीप क्लिनींगचे आयोजन, महापालिका कारभार डिजिटल आदी कामामुळे आयुक्त आव्हाळे प्रकाश झोतात आल्या असून राज्य शासनकडे शासन नियुक्ती अधिकाऱ्याची मागणी केली आहे.