ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे अवघे ५१३ रुग्ण सापडले; १६  मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 08:25 PM2020-11-03T20:25:31+5:302020-11-03T20:25:39+5:30

ठाणे शहरातून १५२ रुग्णांची नोंद झाली. आता या शहरात ४७ हजार १५२ बाधीत रुग्ण झाले आहेत. तर,  एकाचा मृत्यू झाल्याने एक हजार १५९ जणांच्या मृत्यू नोंदले गेले आहे.

Only 513 corona patients found in Thane district; 16 deaths | ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे अवघे ५१३ रुग्ण सापडले; १६  मृत्यू

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे अवघे ५१३ रुग्ण सापडले; १६  मृत्यू

Next
ठळक मुद्देठाणे शहरातून १५२ रुग्णांची नोंद झाली. आता या शहरात ४७ हजार १५२ बाधीत रुग्ण झाले आहेत. तर,  एकाचा मृत्यू झाल्याने एक हजार १५९ जणांच्या मृत्यू नोंदले गेले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होत असून सोमवारच्या रुग्ण संख्ये प्रमाणेच मयतची संख्या मंगळवारी कायम राहिली आहे. जिल्ह्यात ५१३ रुग्ण सापडले असून फक्त १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दोन लाख १३ हजार  १५९ रुग्ण नोंदल्या गेले आहेत. तर, मृतांची संख्या पाच हजार ३८७ झाली आहे. 
 
ठाणे शहरातून १५२ रुग्णांची नोंद झाली. आता या शहरात ४७ हजार १५२ बाधीत रुग्ण झाले आहेत. तर,  एकाचा मृत्यू झाल्याने एक हजार १५९ जणांच्या मृत्यू नोंदले गेले आहे. कल्याण - डोंबिवलीत ९६ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात ५० हजार ३७८ बाधीत झाले असून आजपर्यंत एक हजार आठ मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगर परिसरात १९ बाधितां असून एकाचाही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत बाधीत रुग्ण दहा हजार २७८ झाले असून ३४० मृत्यूची संख्या आहे. भिवंडीला १७ बधीत आढळून आले असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार ९४१ असून मृतांची संख्या ३३५ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये ३५ रुग्णांची तर, दोन मृतांची नोंद केली आहे. या शहरात आता बाधितांची २२ हजार ७७१ झाली असून मृतांची संख्या ७२५ आहे. 

अंबरनाथमध्ये पाच रुग्णांची नव्याने वाढ. तर, आज दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. आत बाधितांची संख्या सात हजार ३५९ झाली असून मृत्यू २७१ झाले आहेत. बदलापूरला २० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत सात हजार ४१४ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू नाही. आतापर्यंत ९८ मृत्यूची संख्या आहे.  जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात ५६ रुग्णांची आणि सात मृत्यूची नोंद झाली आहे. आता बाधीत १६ हजार ९६५ आणि मृत्यू ५४० झाले आहेत.
 

Web Title: Only 513 corona patients found in Thane district; 16 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.