एकच गजर... हॅपी न्यू ईयर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:13 AM2018-01-01T07:13:55+5:302018-01-01T07:14:18+5:30

ठाणे जिल्ह्यात रविवार उजाडला तोच मुळी सरत्या वर्षाला निरोप देण्याचा उत्साह घेऊन. सलग आलेल्या सुट्या, आठवडाअखेर, महिनाअखेर आणि वर्षअखेरीचे निमित्त साधत आळसावलेल्या सकाळपासून दिवस चढत गेला आणि उत्साहही.

 The only alarm ... Happy new year ...! | एकच गजर... हॅपी न्यू ईयर...!

एकच गजर... हॅपी न्यू ईयर...!

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवार उजाडला तोच मुळी सरत्या वर्षाला निरोप देण्याचा उत्साह घेऊन. सलग आलेल्या सुट्या, आठवडाअखेर, महिनाअखेर आणि वर्षअखेरीचे निमित्त साधत आळसावलेल्या सकाळपासून दिवस चढत गेला आणि उत्साहही. ठाणे असो की डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर अगदी मुरबाड-शहापूरमधील फार्महाऊसेस सगळीकडे गर्दी वाढत गेली. सरत्या वर्षातला सूर्य संध्याकाळी मावळला आणि हॉटेल, पब, इमारतीच्या गच्चीवर, मैदानात आणि नंतरनंतर तर चक्क रस्त्यावर गर्दी होत गेली. रात्री बाराच्या ठोक्याला सर्वत्र एकच उत्साह संचारला. एकच जल्लोष झाला... हॅप्पी न्यू इयरचा!
ठाणेकरांवर रविवारी सायंकाळीच सेलिब्रेशनची झिंग पाहायला मिळाली. सरत्या वर्षाला निरोप देतानाच, गाड्यांचे वाजलेले हॉर्न. चर्चमधील घंटानाद, फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना शुभेच्छा देत ठाणेकरांनी आनंदाने नववर्षाचे स्वागत केले. सोशल मीडियावर तर नववर्ष शुभेच्छांच्या मेसेजेस्चा अक्षरश: खच पडला.
तलावपाळी, उपवनसह शॉपिंग मॉलमध्ये झालेली गर्दी, रंगलेल्या डिनर पार्ट्या, हॉटेल्स्-रेस्टॉरंटबाहेर लागलेल्या रांगा, अनेक सोसायट्यांमध्ये रंगलेले सांस्कृतिक कार्यक्रम, गेम्स्, पार्ट्या, डीजेच्या तालावर थिरकणारी तरूणाई आणि रस्त्यावर बाईक रायडर्सची वाढलेली वर्दळ असे उत्साही वातावरण ठाण्यात पाहायला मिळाले ते नववर्षाच्या पूर्वसंध्येला. अनेकांनी कुटुंबासोबत तर कोणी मित्रांच्या ग्रुपसोबत शनिवारीच सेलिब्रेशन डेस्टिनेशन गाठले होते. त्यामुळे फार्म हाऊस, पिकनिक स्पॉट शनिवारपासूनच फुल्ल होते. ३१ डिसेंबरचा सूर्य अस्ताला जात असतानाच म्हणजेच रविवारी सायंकाळपासून खºया अर्थाने सेलिब्रेशनला सुरूवात झाली. हे सेलिब्रेशन पहाटेपर्यंत सुरू होते. काही सोसायच्यांच्या आवारात महिला, ज्येष्ठांचे स्वतंत्र कार्यक्रम रंगले होते. त्यामुळे नववर्ष स्वागताचा उत्साह हा बच्चे कंपनीपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत दिसून आला. खाऊ गल्ल्या, फूड कॉर्नर आणि हॉटेल्स् सायंकाळपासूनच गर्दीने फुल्ल झाले होते. यंदा थर्टीफर्स्ट आणि रविवार असा योग जुळून आल्याने नॉनव्हेजवर खवय्यांनी ताव मारला होता. त्यामुळे त्यांच्या हॉटेल्ससह आईस्क्रीम पार्लरमध्ये डिलिव्हरीसाठी बराचवेळ थांबून रहावे लागत होते.

सोशल मीडियावर पडला मेसेजेसचा खच

सेकंदासेकंदाला अपडेट असणा-या नेटक-यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून परस्परांना मेसेजेस् पाठवित नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. रविवारी सायंकाळपासूनच या मेसेजस्च्या देवाणघेवाणीला सुरूवात झाली होती.
रात्री १२ च्या ठोक्याला तर या मेसेजेस् आणि पोस्टचा अक्षरश: खच पडला. इतके की नेटवर्क जाम झाले. आठवणी, आभार मानणारे मेसेजेस् व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर झटपट पोस्ट होत होते. जीफ फाइलनेही रंगत आणली.

रंगल्या शेकोटी पार्र्ट्या
ठाणे जिल्ह्यातील गारेगार वातावरणात ऊब आणली ती शेकोटी पार्ट्यांनी. नाच-गाणी, सोबत खाणे-पिणे आणि शेकोटीची ऊब असा मस्त माहोल रंगला होता.

Web Title:  The only alarm ... Happy new year ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे