केवळ सत्काराचेच आश्वासन, अग्निशमनच्या मागण्या दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:46 AM2017-11-27T06:46:12+5:302017-11-27T06:46:22+5:30
केडीएमसीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना जोखीम भत्ता देणे, रिक्त पदे भरणे, दुसरा व चौथा शनिवार सुटी देणे या व अशा मागण्यांवर कुठलीच कृती न करता केवळ उल्लेखनीय कामगिरी करणा-या
- प्रशांत माने
कल्याण : केडीएमसीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना जोखीम भत्ता देणे, रिक्त पदे भरणे, दुसरा व चौथा शनिवार सुटी देणे या व अशा मागण्यांवर कुठलीच कृती न करता केवळ उल्लेखनीय कामगिरी करणाºया कर्मचाºयांचा प्रजासत्ताक दिनी व स्वातंत्र्य दिनी सन्मान करण्याच्या दिखाऊ आश्वासनावर या कर्मचाºयांची महापालिका प्रशासनाने बोळवण केली आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना या कामगारांचे नेतृत्व करणाºया भारतीय कामगार सेनेनी तलवार म्यान कशी केली, असा सवाल अग्निशमन कर्मचारीच करीत आहेत.
अग्निशमन कर्मचाºयांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता १ ते १५ जून या कालावधीत ‘काळी फीत’ आंदोलन छेडले होते. २६ जूनला रमजान ईदच्या दिवशी सामूहिक रजा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. महिनाभरात मागण्यांबाबत ठोस कार्यवाही करण्याच्या प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.
अग्निशमन विभागातील रिक्त पदांवर नवीन भरती, सुट्टीच्या दिवशी जादा काम केल्याचा मोबदला या व अशा मागण्यांकरिता भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले होते. ९० कर्मचाºयांनी सामूहिक रजेचे अर्ज सामान्य प्रशासन विभागाला सादर केले. कर्मचाºयांचा आक्रमक पवित्रा पाहून महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासन आणि संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी संघटनेचे केडीएमसी युनिटचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त संजय घरत, अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड आणि सुधाकर कुलकर्णी उपस्थित होते. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेचा अहवाल पुढील महासभेत सादर करून महिनाभरात ठोस कृती केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परिणामी सामूहिक रजा आंदोलन मागे घेत असल्याचे संघटनेने जाहीर केले. याबाबत अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुन त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला.
कर्मचाºयांच्या प्रमुख मागण्या व आश्वासने
कर्मचाºयांना विशेष वेतन जोखीम भत्त्यापोटी दरमहा फायरमन यांना ३८० रूपये आणि लिडींग फायरमन ते अधिकारी यांना ४०० रूपये.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मोबदला.
अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करणार, अधिकारी-कर्मचारी यांची एकूण ५२ रिक्त पदे भरणार. तोपर्यंत उपलब्ध कर्मचाºयांकडून करुन घेण्यात येणाºया अतिरिक्त कामाचा मोबदला देणार.
सेवाज्येष्ठता यादीतील त्रुटींसंदर्भात बैठक घेणार.
उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया कर्मचाºयांचा २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) व १५ आॅगस्ट (स्वातंत्र्य दिनी) विशेष सत्कार करणार. उल्लेखनीय कामगिरी करणाºयांना मागील १५ आॅगस्टला देण्यात आलेले पुरस्कार वगळता उर्वरीत एकही प्रमुख मागणी प्रशासनाने पूर्ण केलेली नाही.
आर्थिक चणचणीचे कारण पुढे करीत प्रशासन अग्निशन कर्मचाºयांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास टाळाटाळ करीत आहे. अन्य महापालिकांकडून माहिती मागवत असल्याचे सांगून वेळकाढू धोरण अवलंबत आहे. आश्वासनाच्या पूर्ततेकरिता पुन्हा प्रशासनाला स्मरणपत्र दिले जाईल.’’
-कैलास शिंदे, अध्यक्ष, भारतीय कामगार संघटना, कल्याण युनिट