देशात ५० हजार वनस्पतींपैकी केवळ पाच हजाराची नोंद - सोनल पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 06:25 AM2018-01-03T06:25:47+5:302018-01-03T06:26:00+5:30

जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे.

 Only five thousand records of 50 thousand plants in the country - Sonal Patankar | देशात ५० हजार वनस्पतींपैकी केवळ पाच हजाराची नोंद - सोनल पाटणकर

देशात ५० हजार वनस्पतींपैकी केवळ पाच हजाराची नोंद - सोनल पाटणकर

Next

अंबरनाथ - जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे. आपल्याकडची पारंपारिक वनौषधी बहुगुणी असली तरी जागतिक स्तरावर त्या औषधांचा फारसा प्रसार झालेला नाही.
आयुर्वेदिक औषधे आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवू शकली नाहीत. नवनव्या विज्ञान विषय शाखा निवडून देशातील तरु णांनी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे, अस मत सोनल आयकर-पाटणकर यांनी व्यक्त केले. येथील मराठी विज्ञान परिषदेतर्फे रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्र मात ते बोलत होते.
सरत्या वर्षाच्या अखेरच्या रविवारी मराठी विज्ञान परिषदेने बदलापूर येथील तरूण संशोधक डॉ. सौरभ पाटणकर आणि सोनल आयकर-पाटणकर या दाम्पत्याचे व्याख्यान झाले. जैविक वनस्पतीजन्य पदार्थांपासून अतिसूक्ष्म काष्ठशिल्प बनवण्यात यशस्वी ठरलेल्या प्रयोगाविषयी डॉ. पाटणकर यांनी उपस्थितांना माहिती दिली. सध्या पेट्रोलजन्य इंधनामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्याला पर्याय ठरणाºया पर्यावरणस्नेही इंधनांचा सध्या शोध सुरू आहे.
अतिसूक्ष्म तंत्रज्ञान शाखेत (नॅनो-टेक्नॉलॉजी) पर्यावरणस्नेही पद्धतीने प्रक्रि या करून जैविक घटकांपासून उर्जा मिळवण्याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात जैविक कचरा बनतो. त्यापासून उर्जा मिळवली तर ती किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही ठरेल. तसेच त्यामुळे देश स्वयंपूर्ण होईल, असेही सौरभने सांगितले. जैविक घटकांपासून पर्यावरणस्नेही पद्धतीने बनविलेले अतिसूक्ष्म काष्ठशिल्प वैद्यकीय साधने बनवण्यात उपयोगी ठरतील, अशी आशाही त्याने व्यक्त केली.
सोनल आयकर-पाटणकर मानवनिार्मित जीवशास्त्र विषयात कॅनडामध्ये पीएच.डी करीत आहेत. त्यांनी तुलनेने नवीन असणाºया या विषय शाखेची ओळख करून दिली. तसेच सध्याच्या काळातील तिच्या उपयुक्ततेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कॅनडामध्ये संशोधक म्हणून कार्यरत असलेले सौरभ आणि सोनल मागील आठवडयात भारतात होते. त्यादरम्यान त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, याहेतूने मराठी विज्ञान परिषदेने त्यांचे व्याख्यान ठेवले.
हे अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी अंबरनाथमधील रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

विज्ञानप्रेमींची गर्दी : आधुनिक विज्ञानातील हे पर्यावरणस्नेही संशोधन देशासाठी उपयोगात आणण्याचा मनोदयही दोघांनी व्यक्त केला. समारंभादरम्यान मराठी विज्ञान परिषदेच्या अंबरनाथ विभागाचे अध्यक्ष प्रा. भगवान चक्र देव यांच्या हस्ते सौरभ आणि सोनल यांचा सत्कार करण्यात आला. अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शहरांमधील विज्ञानप्रेमी या कार्यक्र माला मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Only five thousand records of 50 thousand plants in the country - Sonal Patankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.