विसर्जन घाटावर अँटिजन चाचणीत केवळ एकजण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:50 AM2021-09-16T04:50:12+5:302021-09-16T04:50:12+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जन घाटांवर करण्यात आलेल्या कोरोनाची अँटिजन चाचणीत केवळ एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली. ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जन घाटांवर करण्यात आलेल्या कोरोनाची अँटिजन चाचणीत केवळ एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली. विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांपैकी ज्यांनी तोंडाला मास्क लावलेला नसेल अशा व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात होती. पाच दिवसांच्या गणपती विसर्जन करिता मास्क न लावता आलेल्या २ हजार ५५२ भाविकांची अँटिजन चाचणी करण्यात आली. आहे. शहरातील २४ ठिकाणी ही चाचणी मोहीम सुरु आहे. सातव्या व दहाव्या दिवशी विसर्जनाला येणाऱ्या भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये या उद्देशाने ठाणे महापालिकेने दीड दिवस, पाच, सात आणि १० व्या दिवशी विसर्जन स्थळी अँटिजन चाचणी सुविधा उपलब्ध केली. ज्या नागरिकांना ही चाचणी करायची असेल त्यांनीच ती करावी असे पालिकेने स्पष्ट केले. विसर्जनाच्या दिवशी कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यात आली. विसर्जनाला येणाऱ्या अनेकांनी आपल्या तोंडावर मास्क वापरला नसल्याने अशांना या चाचण्या करण्यास भाग पाडले जाते. यापूर्वी दीड दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी देखील १ हजार १९२ भाविकांच्या अँटिजन चाचण्या करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत ३ हजार ७७४ जणांच्या अँटिजन चाचण्या करण्यात आल्या.
..........
वाचली