चरितार्थासाठी राजकारणावर अवलंबून नसलेले एकमेव राजकारणी म्हणजे टिळक : चंद्रेशखर टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 05:26 PM2019-08-13T17:26:15+5:302019-08-13T17:28:13+5:30
ठाणे : लोकमान्य टिळकांनी भारतीय राजकारणाची व्याख्या बदलली. त्यांचे कर्तुत्वच अलौकीक होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या ...
ठाणे : लोकमान्य टिळकांनी भारतीय राजकारणाची व्याख्या बदलली. त्यांचे कर्तुत्वच अलौकीक होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या लोकप्रिय वाक्याने टिळक ओळखले जातात. संपूर्ण आशिया खंडात ‘मिळवायचा’ हा शब्द वापरणारे भारतीय राजकीय एकमेव नेते तसेच, पुर्ण वेळ राजकारणी असताना चरितार्थासाठी राजकारणावर अवलंबून नसलेले एकमेव राजकारणी म्हणजे टिळक असे मत अर्थतज्ञ, लेखक चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.
ठाणे नगर वाचनमंदिरातर्फे वा. अ. रेगे सभागृहात‘असे ही लोकमान्य’ या विषयावर चंद्रशेखर टिळक यांचे सोमवारी जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. दोन तासांच्यावर कार्यक्रम नसावा हा दंडक टिळकांनी घातला. टिळकांचे विविध पैलूंचे वर्णन करणाऱ्या पुस्तकांपासून व्याख्यानाची सुरूवात करण्याचा मानस चंद्रशेखर टिळक यांनी यावेळी व्यक्त केला. गोविंदराव चळवळकर यांनी त्यांच्या पुस्तकाचे नाव ‘बाळ गंगाधर टिळक’ हे नाव का ठेवले असा त्यांना एकदा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, लोकमान्य टिळकांना कोणतेही विशेषणे लावले तरी ते अपुरे आहे असे उत्तर त्यांनी दिले. प्रभाकर पुजारी यांनी भारतीय संस्कृती योगी लोकमान्य टिळक हे पुस्तक लिहीले आहे त्यात दहा प्रकरणे आहेत. त्याचे शिर्षक लक्षात घेतले तर त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लक्षात येते. जनतेने चिळकांच्या बचावासाठी एकापेक्षा अधिक वेळा पैसा उभा केला होता. परंतू त्यांनी तो स्वत:साठी कधी न घेता विश्वस्त निधी म्हणून ठेवला आणि त्याचा हिशोब ते केसरीमधून मांडत होते. पैसा फंड ही संकल्पना टिळळकांनी सुरू केली नाही तर ती पिंपरी - चिंचवडमधील एका समुहाने सुरू केली. पैसा फंडवाली मंडळी चांगल्या अर्थाने टिळकांच्या मागे हहोती. त्यावेळी टिळक त्यांना म्हणाले तुमचे काम चांगले आहे, ‘मी तुमच्या मंडळावर आलो तर ब्रिटीशांची गैरनजर तुमच्या मंडळावर पडेल, तुम्ही असे काही करु नका पण तुम्हाला हवे तेथे तुम्ही माझे नाव वापरा’. आपल्या नावामुळे पैसा मिळत असेल तर त्याचे उत्तरदायित्व टिळकांवर होते. पैसा फंडची प्रत्येक बॅलेन्सशीट प्रत्येक आठवड्याला केसरीमध्ये छापून येत यावरुन त्यांचे द्रव्यशुद्धयोगीपण दिसून येते. कामगारांचे पहिले नेते हे लो. टिळक होते. कामगारांना आठ तासांची ड्युटी याचे जनक टिळकच. टिळक म्हणायचे वाढवायचा असेल तर जेवणाची वेळ वाढवा, त्यामुळे आता जो एक तासांचा लंचब्रेक आहे त्याचे जनक टिळक आहेत. आज सहा महिने प्रेग्नन्सी लिव्ह दिली जाते त्याचे सुतोवाच टिळकांनी दिले होते. टिळकांना स्वराज्य हवे होते पण ते स्वत:साठी कधीही नाही. ‘टिळक हे वेगवेगळ््या पद्धतीने विचार करीत असे. सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडताना टिळक म्हणाले की धर्माचे अधिष्ठान राष्ट्राला हवे, धर्माचा पेहराव नको असे प्रतिपादन चंद्रशेखर टिळक यांनी शेवटी केले. यावेळी ठाणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष केदार जोशी उपस्थित होते.