भर वस्तीतील मेडिकलमध्ये शिरला कोल्हा अन् उडाली एकच खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 05:22 PM2021-01-18T17:22:28+5:302021-01-18T17:23:00+5:30

Thane : वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तब्बल अडीच तासानंतर या कोल्ह्याला बाहेर काढण्यात आले.

The only sensation in the overcrowded medical center is the fox! | भर वस्तीतील मेडिकलमध्ये शिरला कोल्हा अन् उडाली एकच खळबळ!

भर वस्तीतील मेडिकलमध्ये शिरला कोल्हा अन् उडाली एकच खळबळ!

googlenewsNext
ठळक मुद्देठाण्यातील खारकर आळी परिसरात असलेल्या श्री मेडिकलमध्ये सकाळी ११.३० च्या दरम्यान हा कोल्हा शिरला.

ठाणे : ठाण्यातील खारकर आळी परिसरातील एका मेडिकलमध्ये सोमवारी सकाळी अचानक ११.३० च्या सुमारास कोल्हा घुसल्याने एकच खळबळ उडाली. सुरुवातीला मेडिकलच्या मालकाला कुत्रा असल्याचे वाटल्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा कुत्रा नसून कोल्हा असल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तब्बल अडीच तासानंतर या कोल्ह्याला बाहेर काढण्यात आले. पकडण्यात आलेल्या कोल्ह्याला मेडिकलसाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर तो किती वर्षाचा आहे, हे समजणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाण्यातील खारकर आळी परिसरात असलेल्या श्री मेडिकलमध्ये सकाळी ११.३० च्या दरम्यान हा कोल्हा शिरला. मेडिकलचे मालक राहुल पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समोरच्या गल्लीतुन अचानक हा कोल्हा आमच्या मेडिकलमध्ये घुसला. तो सरळ आतमध्ये जाऊन बसला. सुरुवातीला तो कुत्रा असल्याचे वाटल्याने त्याला झाडूने आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने झाडू देखील पकडून ठेवला. त्यानंतर हा कुत्रा नसून कोल्हा असल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र आम्ही सरळ मेडिकल बंद करून थेट ही सर्व माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर काही वेळेतच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन या कोल्ह्याला पकडण्याचा प्रयत्न सुरु केला.

वन विभागाचे अधिकारी संजय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोशिएशन तसेच प्राणी मित्र संस्था यांच्या मदतीने या कोल्ह्याला पकडण्यात अडीच तासानंतर यश आले. ठाणे खाडी परिसरातून हा कोल्हा आला असून या कोल्ह्याचा पाठलाग भटक्या कुत्र्यांनी केल्यामुळे तो मेडिकलमध्ये घुसला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ठाणे खाडी पासून हा परिसर ५०० मीटरवर हा परिसर असल्याने भर मार्केटमध्ये हा कोल्हा घुसला असावा. ठाणो खाडीत खेकडे आणि मासे खाण्यासाठी हे कोल्हे येत असल्याचे त्यांनी सांगितले. या कोल्ह्याला मेडिकलसाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर सर्व माहिती समजणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: The only sensation in the overcrowded medical center is the fox!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे