अवघ्या तीन हजारांत घेतली होती स्फोटके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 05:04 AM2017-08-09T05:04:14+5:302017-08-09T05:04:14+5:30

मुंब्रा येथून पोलिसांनी हस्तगत केलेला स्फोटकांचा साठा आरोपींनी अवघ्या तीन हजार रुपयांमध्ये विकत घेतला होता. ही स्फोटके विकणाऱ्याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे.

 Only three thousand took the explosives! | अवघ्या तीन हजारांत घेतली होती स्फोटके!

अवघ्या तीन हजारांत घेतली होती स्फोटके!

Next

ठाणे : मुंब्रा येथून पोलिसांनी हस्तगत केलेला स्फोटकांचा साठा आरोपींनी अवघ्या तीन हजार रुपयांमध्ये विकत घेतला होता. ही स्फोटके विकणाऱ्याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे.
रेल्वे सुरक्षा दल, दहशतवादविरोधी पथक आणि मुंब्रा पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये मुंब्रा-पनवेल मार्गावरील गौसिया कंपाउंडजवळच्या एका गॅरेजमधून स्फोटकांचा साठा रविवारी हस्तगत करण्यात आला. या गॅरेजचे मालक इस्माईल शेख यांना गंभीर गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी आरोपींनी गॅरेजच्या आवारातील भंगारगाडीमध्ये स्फोटके ठेवली होती. पोलिसांनी याप्रकरणी महिंसा राजेसाब गणुर उर्फ महेश, शहाआलम मेहमूद शेख आणि आरिफ नवाबअली खान यांना अटक केली असून, तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. महिंसा गणुर रेतीबंदरमध्ये मजुरी करतो. या भागात अवैध उत्खनन व्यावसायिकांच्या तो संपर्कात होता. या ओळखीतूनच त्याने डोंबिवली येथील रेतीबंदरातून १0 किलो अमोनियम नायट्रेट आणि ९ डिटोनेटर्स विकत घेतले होते. हा साठा त्याने अवघ्या तीन हजारांत विकत घेतला. त्यांच्याकडून स्फोटके विकणाºयाचा तपशील पोलिसांना मिळाला आहे. मात्र, महसूल विभागाने मध्यंतरी रेतीबंदर भागात केलेल्या कारवाईमुळे येथील अवैध उत्खननाचा गोरखधंदा तुर्तास थंडावला आहे. त्यामुळे आरोपींना स्फोटके विकणाºया व्यक्तीपर्यंत पोलीस यंत्रणा अद्याप पोहोचू शकली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्फोटकांची सहज उपलब्धता चिंतेचा विषय
घातक स्फोटकांची सहज उपलब्धता आणि सतर्कतेच्या काळातही विनासायास होणारी वाहतूक पोलिसांसाठी नक्कीच चिंतेचा विषय आहे. स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले असताना, आरोपींनी स्फोटके डोंबिवलीतून विकत घेतली आणि त्याची मुंब्य्रापर्यंत विनासायास वाहतूकही केली, हे विशेष. घातपात घडवणे हे किती सहज शक्य आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Web Title:  Only three thousand took the explosives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.