बनावट कागदपत्रांद्वारे आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्याचं उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 09:36 PM2017-12-13T21:36:52+5:302017-12-13T21:37:09+5:30

मीरा रोड - शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कागदपत्रांच्या आधारे खरे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Open card and PAN card through fake documents | बनावट कागदपत्रांद्वारे आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्याचं उघड

बनावट कागदपत्रांद्वारे आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्याचं उघड

googlenewsNext

मीरा रोड - शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कागदपत्रांच्या आधारे खरे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत नगरसेवकाची कोरी लेटरपॅड, शासकीय तसेच विशेष कार्यकारी अधिका-यांचे रबरी शिक्के, शाळा सोडल्याचे कोरे दाखले, लग्न नोंदणी दाखला, शिधावाटपच्या को-या पत्रिका आदी जप्त करण्यात आले आहेत.

एका संस्थेस नरेश जयंतीलाल मेहता रा. महावीर कॉ. आॅप. सेसायटी, डॉ. आंबेडकर ( ६० फूट )मार्ग, भाईंदर यांच्या भार्इंदरच्या वालचंद शॉपिंग सेंटरमध्ये मेहता असोसिएट्स या कार्यालयातून बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार ओळखपत्र, पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याची माहिती मिळाली. स्वत: संस्थेच्या वतीने ४ आॅक्टोबर रोजी बनावट ग्राहक पाठवण्यात आला असता कोणतीही कागदपत्रं नसली तरी २ हजार रुपये दिल्यास आधार ओळखपत्र बनवून दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने त्या ग्राहकाने २ हजार रुपये दिले असता त्यास पावतीसुद्धा देण्यात आली. तसेच १५ - २० दिवसांत आधार ओळखपत्र मिळेल असे सांगण्यात आले.

कोणतेही पुरावे नसताना सर्रास आधार व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याची बाब अतिशय गंभीर व देशाच्या सुरक्षिततेशी निगडीत असल्याने संस्थेच्या वतीने या प्रकरणी दुस-याच दिवशी म्हणजे ५ आॅक्टोबर रोजीच भार्इंदर पोलीस ठाण्यास लेखी तक्रार करून त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान १ नोव्हेंबर रोजी संस्थेच्या वतीने पाठवलेल्या बनावट ग्राहकाचे कुठलाही पुरावा दिला नसतानाच खरं आधार ओळखपत्र बनवून आले. परंतु या प्रकरणी भार्इंदर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने अखेर संस्थेच्या प्रतिनिधींनी पोलीस उपअधीक्षक नरसिंह भोसले यांची भेट घेऊनही कारवाई होत नसल्याची तक्रार केली. अखेर भोसले यांच्या निर्देशानंतर तब्बल दोन महिन्यांनी म्हणजे ६ डिसेंबर रोजी उपनिरीक्षक बागल यांनी मेहता असोसिएट्सच्या कार्यालयावर धाड टाकली.

बागल यांनी टाकलेल्या धाडीत मेहता याच्या कार्यालयातून आयकर विभागाच्या आवक जावकचा रबरी शिक्का, भाजपा नगरसेवक डॉ. राजेंद्र जैन यांचे ३ कोरे शिक्के असलेले लेटरपॅड, काँग्रेसचे पालिका निवडणुकीतील उमेदवार साहेबलाल यादव व मुकेश रावल यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, ठाण्याचे शासकीय शिक्के, पोद्दार शाळेचे शाळा सोडल्याचे १५ कोरे दाखले, शिधावाटप पत्रिका व कोरी पानं, विविध जन्म दाखले, लग्न नोंदणी दाखला आदी मुद्देमाल सापडला होता.

धाड टाकल्यानंतर देखील गुन्हा दाखल केला जात नसल्याने मनसेचे विभागीय चिटणीस प्रमोद देठे यांनी ११ डिसेंबर रोजी शासनासह पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, भाईंदर पोलीस ठाणे आदींना लेखी निवेदन देऊन गुन्हा दाखल होत नसल्याबद्दल आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर १२ डिसेंबर रोजी भार्इंदर पोलिसांनी संस्थेचे गणेश फडके यांच्या फिर्यादीवरून नरेश मेहता विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. परंतु आरोपी मेहता मात्र पसार झाला आहे. पण त्याचे कार्यालय मात्र आजही सुरूच आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवलं जातंय, याची खातरजामा झाल्यावर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीचा शोध सुरू असून त्याने आतापर्यंत किती आधार व पॅन कार्ड बनवले आणि कोणत्या कागदपत्रांआधारे बनवले याचा तपशील आम्ही सबंधित यंत्रणेकडून मागवला आहे, असे भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.

Web Title: Open card and PAN card through fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.