कळवा तिसऱ्या खाडी पुलाची एक लेन खुली करा, जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

By अजित मांडके | Published: September 23, 2022 04:17 PM2022-09-23T16:17:20+5:302022-09-23T16:18:51+5:30

आव्हाड यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन ही मागणी केली.

Open one lane of Kalwa third bay bridge, Jitendra Awhad met the Chief Minister! | कळवा तिसऱ्या खाडी पुलाची एक लेन खुली करा, जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

कळवा तिसऱ्या खाडी पुलाची एक लेन खुली करा, जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

googlenewsNext

ठाणे  : नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी कळवा खाडीवर उभारण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलावरील एका मार्गिकेचे काम ऑगस्ट महिनाअखेर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने ठेकेदाराला दिले होते. मात्र, सप्टेंबर महिना अर्धा झाला असून आता याचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु कळवा भागातील नागरीकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी ही लेन तत्काळ सुरु करावी, अशी मागणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शुक्रवारी केली. आव्हाड यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन ही मागणी केली. त्यानुसार नवरात्रोत्सवात ही लेन खुली करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

ठाणे  आणि कळवा याला जोडण्यासाठी दोन खाडी पुल आहेत. त्यापैकी ब्रिटीशकालीन पुल धोकादायक झाल्याने तो काही वर्षांपुर्वीच वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुसऱ्या पुलावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी तिसरा खाडी पुल उभारण्यात येत आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या पुलाच्या कामाची मुदत होती. त्यानंतर डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. विविध कारणाने पुलाचे काम रखडत असल्याचे दिसून आले. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना एक पत्न देऊन हा पुल लवकर वाहतूकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. 

तर, दुसरीकडे ठाणो महापालिकेने या पुलाचे काम महिनाभरात उरकून तो वाहतूकीसाठी खुला करण्याची तयारी सुरु  केली होती. त्यानुसार या पुलावरील पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका आणि ठाणो-बेलापूर रोड या एका मार्गीकेचे काम कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी संबधींत ठेकेदाराला दिले होते.

परंतु आता सप्टेंबर महिना संपत आला तरी देखील हा पुल वाहतुकीसाठी खुला होत नसल्याने अखेर शुक्रवारी आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शुभदिप या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान कळवा भागात राहणा:या नागरीकांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्यासाठी एक लेन तत्काळ सुरु करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार नवरात्रोत्सवाच्या कालावधीत ही लेन खुली केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.
 

Web Title: Open one lane of Kalwa third bay bridge, Jitendra Awhad met the Chief Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.