बदलापुरात रक्तपेढी उभारण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:21+5:302021-03-14T04:35:21+5:30
बदलापूर : बदलापूरमध्ये रक्तपेढी उभारावी, अशी मागणी सातत्याने होत होती. त्या अनुषंगाने आता राज्य सरकारने बदलापुरात रक्तपेढी उभारण्यास परवानगी ...
बदलापूर : बदलापूरमध्ये रक्तपेढी उभारावी, अशी मागणी सातत्याने होत होती. त्या अनुषंगाने आता राज्य सरकारने बदलापुरात रक्तपेढी उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे भविष्यात बदलापूरमधील रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.
मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले बदलापूर शहर आरोग्य सुविधेबाबत कमी पडले आहे. बदलापूर शहर वाढत असताना रक्तपेढी निर्माण होत होती. रक्तपेढीअभावी अनेक रुग्णांचे प्राणही धोक्यात येत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. बदलापूरचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कालिदास देशमुख यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व अन्य औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना निवेदन देऊन लवकरात लवकर बदलापूरकरांसाठी रक्तपेढी उपलब्ध करावी, अशी मागणी केली. टोपे व शिंगणे यांनीही शहरात चिदानंद ब्लड बँकेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. आता लवकरच बदलापूरकरांची ही समस्या सुटणार आहे, असे यावेळी देशमुख यांनी सांगितले.