सिनेअभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या हस्ते ठाणे कलाभवन येथे छायाचित्र प्रदर्शनाचं उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:21 PM2018-08-20T17:21:54+5:302018-08-20T17:24:26+5:30
सिनेअभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या हस्ते ठाणे कलाभवन येथे छायाचित्र प्रदर्शनाचं उदघाटन करण्यात आले.
ठाणे : जागतिक छायाचित्रकारदिनाचे औचित्य साधून ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २० ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान ठाणे कलाभवन येथे प्रिंट मीडिया मधल्या छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन सोमवारी सिनेअभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या हस्ते झाले आहे.
वृत्तपत्र छायाचित्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता छायाचित्र काढत असतात त्यांचे या प्रदर्शनात असलेली छायाचित्रे मनाला अत्यंत भावली असल्याची प्रतिक्रिया सिनेअभिनेत्री नम्रता गायकवाड यांनी व्यक्त केली. आजचं ठाण्यातील वृत्तपत्र छायाचित्रकाराणंच हे प्रदर्शन पाहून मी एका वेगळ्याच विश्वात गेल्याचं मला जाणवलं आहे. सध्याच्या काळातील वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या समोरची आवाहने वाढली आहेत प्रत्येक छायाचित्र एक वेगळी भावना प्रकट करत असते सध्याच्या काळातील मोबाईल छायाचित्रांमुळे वृत्तपत्र छायाचित्रंकारकांच्या समोरची आवाहने अत्यंत वाढली आहे असे असले तरी वृत्तपत्र छायाचित्रे भावनांशी जुडले गेले आहे असं नम्रता गायकवाड यावेळी म्हणाल्या छायाचित्र प्रदर्शनात शहरी बरोबरच ग्रामीण भागातील छायाचित्रांचा समावेश आहे. छायाचित्रकारांनी आदिवासी भागातील केलेले छायाचित्रण संवेदनशील आहे. ही संवेदना अशीच जागृत ठेवून पुढील छायाचित्रणाच्या वाटचाली साठी नम्रता गायकवाड यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. विविध प्रसिध्दी माध्यमात काम करत असणाऱ्या ठाण्यातील वृत्तपत्र छायाचित्रकारांना एकाच व्यसपीठाखाली त्यांनी काढलेल्या छायाचित्रांना प्रदर्शनाद्वारे एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने छायाचित्र प्रदर्शन हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यावर्षीच्या प्रदर्शनात १४ छायाचित्रकारांच्या विविध विषयांवरील १५० छायाचित्रं ठाणेकरांना पाहता येणार आहेत.