संभाव्य यादीत आयारामांना संधी

By admin | Published: February 3, 2017 03:21 AM2017-02-03T03:21:47+5:302017-02-03T03:21:47+5:30

बंडखोरीची शक्यता प्रत्येक पक्षाला भेडसावत असल्याने अद्याप एकाही प्रमुख पक्षाने आपली यादी जाहीर केलेली नाही. परंतु, यात भाजपाची संभाव्य किंबहुना

The opportunities for Ayaraam in a possible list | संभाव्य यादीत आयारामांना संधी

संभाव्य यादीत आयारामांना संधी

Next

ठाणे : बंडखोरीची शक्यता प्रत्येक पक्षाला भेडसावत असल्याने अद्याप एकाही प्रमुख पक्षाने आपली यादी जाहीर केलेली नाही. परंतु, यात भाजपाची संभाव्य किंबहुना ८० टक्के पक्की असलेली यादी व्हायरल झाली आहे. यामध्ये शिवसेनेतून अनेक जण आपल्याकडे येणार, असे गृहीत धरून त्यांच्यासाठी काही जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत, तर नारायण पवार, अशोक राऊळ यांची नावे यादीत असून राऊळ यांनी अद्यापही भाजपामध्ये प्रवेश केलेला नाही. तर, कळव्यातील गणेश साळवी यांनीदेखील शिवसेना सोडली नसतानाही त्यांच्या पत्नीचेही नाव या यादीत आले आहे. तसेच सुधाकर चव्हाण यांचे नाव अजूनही गुलदस्त्यात ठेवले आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना भाजपाने तिकीट पक्के केले आहे. रिपाइंच्यादेखील सहा उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. तसेच आयारामांवरदेखील विशेष कृपा केली आहे.
ठाण्यात खऱ्या अर्थाने शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच काहीशी लढत होणार असली तरी आज पाचही प्रमुख पक्षांनी आपली यादी बंडखोरी अटळ असल्याने अद्यापही जाहीर केलेली नाही. अशातच भाजपाने अंतिम मंजुरीसाठी तयार केलेली संभाव्य यादी बाहेर आली असून शिवसेनेतून काही मासे गळाला लागू शकतात, ही अपेक्षा बाळगून काही ठिकाणचे उमेदवार घोषित केलेले नाहीत. यामध्ये प्रभाग क्रमांक ४, ५, ७ आणि ३३ चा समावेश असून या ठिकाणी इतर पक्षांतील मासे गळाला लावण्याचा विचार भाजपाचा सुरू आहे. प्रभाग क्रमांक १८ ड, २९ मध्ये ब, क आणि ड तसेच प्रभाग क्रमांक ३२ मध्ये ब या ठिकाणचे उमेदवारही निश्चित नाहीत. तसेच कळव्यातील उमेश पाटील यांनादेखील भाजपाने गृहीत धरून त्यांचा प्रवेश झाल्यास हर्षला बुबेरा यांचे नाव सोडून इतर नावांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे नुकतेच काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेले नारायण पवार यांचे नावदेखील यादीत निश्चित केले. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अशोक राऊळ यांचा अद्याप प्रवेश झाला नसतानादेखील त्यांचे नाव यादीत आहे. दुसरीकडे लक्ष्मण टिकमाणी यांच्या जागी त्यांच्या मुलाचे नाव यादीत आहे.
दरम्यान राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेतून आलेल्या आयारामांपैकी बहुतेक सर्वांचीच नावे यादीत समाविष्ट केली आहेत. हंडोरे, सुधाकर चव्हाण, सीताराम राणे आदींसह काही नावे अद्यापही यादीत दिसलेली नाहीत. त्यामुळे यातील कोणाला तिकीट पक्के केले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनादेखील यादीत स्थान दिले असून देवराम भोईर यांचा पराभव करणारे तथा शिवसेनेतून भाजपामध्ये डेरेदाखल झालेले लॉरेन्स डिसोझा यांचे नाव यादीत आहे. याशिवाय शारदा पाटील, जयनाथ पूर्णेकर आदींसह इतर काही महत्त्वाची नावे या यादीत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या कारभाराला कंटाळून भाजपात प्रवेश केलेल्या गोकूळनगरच्या पाटील दाम्पत्याचाही या यादीत समावेश आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या मुंब्य्रामध्येदेखील मुस्लिम समाजाला उमेदवारी देऊन भाजपा नशीब आजमावणार आहे. दुसरीकडे, उल्हासनगरमध्ये रिपाइं (आठवले गटाने) शिवसेनेला टाळी दिली असताना ठाण्यात अद्यापही रिपाइंने कोणाला टाळी द्यायची, याचा निर्णय झालेला नाही. तरीसुद्धा, भाजपाने सहा जागा दिल्या असून यामध्ये रिपाइंचे ठाणे शहराध्यक्ष रामभाऊ तायडे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांना संजय घाडीगावकरांच्या पॅनलमध्ये स्थान दिले आहे. काही जणांनी इतर पक्षांतून भाजपात प्रवेश केला असला, तरी त्यांचेदेखील तिकीट कापण्यात येत असल्याचे या यादीतून दिसून येत आहे. त्यामुळे याचा परिणाम बंडखोरी होण्यात होऊ शकतो. (प्रतिनिधी)

- २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ता स्थापनेच्या वेळेस ज्या एका महिलेमुळे अख्खे ठाणे बंद करण्यात आले होते, त्या सुहासिनी लोखंडे यांना मात्र या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर आशा शेरबहादूर सिंग यांचाही पत्ता कापण्यात आला आहे. तसेच राजकुमार यादव यांच्याऐवजी त्यांच्या आईला या यादीत स्थान दिले आहे.



प्रभागवार भाजपाची यादी

प्रभाग क्र.१
अ) राम ठाकूर, ब) पुरुषोत्तम पाटील, क) सुनीता वड किंवा पार्वती हंबीर आणि ड) योगिता पाटील
प्रभाग क्र. २
अ) कमल चौधरी, ब) कविता पाटील, क) मनोहर डुंबरे आणि ड) अर्चना मणेरा
प्रभाग क्र. ३
अ) सुषमा दळवी किंवा नंदा चव्हाण (रिपाइं), ब) जयनाथ पूर्णेकर, क) इंदिरा मढवी आणि ड) रमाकांत पाटील
प्रभाग क्र. ६
अ) विद्या शिंदे, ब) निलेश पाटील, क) जागृती विचारे आणि ड) जगन्नाथ राऊत
प्रभाग क्र. ८
अ) निलेश पाटील, ब) श्वेता अमित नायर, क) शारदा पाटील आणि ड) लॉरेन्स डिसोझा
प्रभाग क्र. ९
अ) भाऊ कांबळे (नगरसेवक उमेश पाटील आल्यास हर्षला बुबेरा वगळून इतर नावे कापण्यात येणार) ब) हर्षला बुबेरा, क) अंकिता जामदार आणि ड) संतोष जोशी
प्रभाग क्र. १०
अ) दिलीप कांबळे, ब) रत्नप्रभा पाटील, क) जयश्री बिराजदार आणि ड) प्रवीण रानडे
प्रभाग क्र.११
अ) दीपा गावंड, ब) नंदा पाटील, क) कृष्णा पाटील आणि ड) मिलिंद पाटणकर
प्रभाग क्र. १२
अ) नारायण पवार, ब) गुणीजन, क) प्रतिमा केदारी आणि ड) अशोक राऊळ
प्रभाग क्र. १३
अ) कैलास पाटील, ब) तृप्ती जोशी पाटील, क) समिरा भारती आणि ड) भूषण पाटील
प्रभाग क्र. १४
अ) बाळा केंद्रे किंवा सचिन पाटील, ब) बबिता सिंह, क) मनीषा बर्गे आणि ड) मयूरेश जोशी
प्रभाग क्र. १५
अ) सुवर्णा कांबळे, ब) वर्षा पाटील, क) केवलादेवी यादव आणि ड) विलास कांबळे
प्रभाग क्र. १६
अ) पुष्पा भालशंकर किंवा अर्चना कांबळे, ब) कल्पना पाटील, क) रिक्त आणि ड) सुनील कोळपकर
प्रभाग क्र. १७
अ) रिक्त, ब) रिक्त, क) रिक्त आणि ड) रामभाऊ तायडे (रिपाइं)
प्रभाग क्र. १८
अ) गीता देशमुख, ब) स्नेहल पाटील किंवा वंदना जाधव क) रिक्त आणि ड) रिक्त
प्रभाग क्र. १९
अ) पूजा गद्रे, ब) भाग्यश्री गाडे (रिपाइं), क) जनार्दन खेतले आणि ड) मिलिंद बनकर
प्रभाग क्र. २०
अ) सुबोध ठाणेकर, ब) रेखा पाटील, क) किरण टिकमाणी आणि ड) भरत चव्हाण
प्रभाग क्र. २१
अ) संजय वाघुले, ब) प्रतिमा मढवी, क) मृणाल पेंडसे आणि ड) सुनेश जोशी
प्रभाग क्र. २२
अ) मिलिंद साळवी (रिपाइं), ब) नम्रता जयेंद्र कोळी, क) रूपाली साळवी आणि ड) विकास दाबाडे
प्रभाग क्र. २३
अ) मनोज साळवी, ब) दीपा गावंड, क) रंजना गाला आणि ड) अशोक भोईर
प्रभाग क्र. २४
अ) जयश्री सोनावणे (रिपाइं), ब) पुष्पा भोंडोकार, क) लक्ष्मीकांत यादव आणि ड) नरेश पवार
प्रभाग क्र. २५
अ) योगेश बोरसे, ब) साळवी यांची पत्नी, क) सारिका वरबडे आणि ड) रामविलास यादव
प्रभाग क्र. २६
अ) ऊर्मिला वाघमोडे, ब) दीपा सैनी, क) प्रशांत सूर्यवंशी आणि ड) मोहम्मद कासीम
प्रभाग क्र. २७
अ) आदेश भगत, ब) अर्चना पाटील, क) सीमा भगत आणि ड) सचिन भोईर
प्रभाग क्र. २८
अ) जयसिंग कांबळे (रिपाइं), ब) कल्पना पाटील, क) रेश्मा पवार आणि ड) रोहिदास मुंडे
प्रभाग क्र. २९
अ) ज्ञानेश्वर पाटील, ब) रिक्त, क) रिक्त आणि ड) रिक्त
प्रभाग क्र. ३०
अ) अमिना लियाकत शेख, ब) यास्मिन खान, क) जमिल चौगुले आणि ड) दिग्विजय सिंह
प्रभाग क्र. ३१
अ) वनिता बावीस्कर, ब) बालिका खैरे, क) दीपक पासी आणि ड) जगदीश मिश्रा
प्रभाग क्र. ३२
अ) अमिना मोमिन, ब) रिक्त, क) इम्रान शिर्के आणि ड) रिक्त

Web Title: The opportunities for Ayaraam in a possible list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.