जात पडताळणीसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी !

By सुरेश लोखंडे | Published: February 17, 2024 08:07 PM2024-02-17T20:07:11+5:302024-02-17T20:07:31+5:30

ऑनलाइन तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Opportunity for Scheduled Tribe students to apply online for caste verification | जात पडताळणीसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी !

जात पडताळणीसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी !

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमाती (एसटी ) राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जोडणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी https://etribevalidity.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाइन तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यर्ना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी पदविका, डिप्लोमा, पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर व्यवसायिक अभ्यासक्रम आदी करिता प्रवेश घ्यावयाचे आहेत, अशा इच्छुक एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जात पडताळणीसाठी https://etribevalidity.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ३१ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा व प्रस्तावाची प्रत प्रत्यक्ष समिती कार्यालयास जमा करावी, असे आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एसटी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

अर्जदाराने जात प्रमाणपत्र पडताळणीचा परिपूर्ण अर्ज दिलेल्या मुदतीत सादर न केल्यास जात वैधता प्रमाणपत्राअभावी होणाऱ्या विलंबास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घेण्यात यावी, तसेच अर्जदारास जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत काही अडचणी असल्यास ठाणे समिती कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक - ०२२ २५३०२०३० वर संपर्क करावा, असेही समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष दिनकर पावरा यांनी सांगितले आहे.
 

Web Title: Opportunity for Scheduled Tribe students to apply online for caste verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे