१५ हजार ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ववत करण्याची आज संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:44 AM2021-09-25T04:44:02+5:302021-09-25T04:44:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण परिमंडळातील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या १५ हजार ग्राहकांना त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण परिमंडळातील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या १५ हजार ग्राहकांना त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत करून घेण्याची संधी मिळत आहे. या ग्राहकांना त्यासाठी तालुका स्तरावर शनिवारी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. महावितरणच्या नियमानुसार मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊन त्यांना थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे.
परिमंडळातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या १५ हजार ग्राहकांना लोकअदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. काही कारणांनी नोटिसा न मिळालेल्या ग्राहकांनाही अदालतीत सहभागी होता येईल. महावितरणच्या नियमानुसार अदालतीत सहभागी ग्राहकांना सवलत देण्यात येईल. या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात येईल. तर ही संधी डावलणाऱ्या संबंधित ग्राहकांवर पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहकांनी लोकअदालतीत सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
दरम्यान, मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते, विधी अधिकारी, उपविधी अधिकारी दीपक जाधव आदी लोक अदालतीत उपस्थित राहणार आहेत.
-----------------