आदिवासींच्या जमिनी लाटल्या विरोधात मोर्चा; पोलिसांवरही आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:44 PM2019-01-29T22:44:17+5:302019-01-29T22:44:26+5:30
सफाळे पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गाव-पाड्यातील आदिवासी जमिनी लाटून बिगर आदिवासी समाजातील लोकांनी घरे बांधली आहेत.
पालघर : सफाळे पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गाव-पाड्यातील आदिवासी जमिनी लाटून बिगर आदिवासी समाजातील लोकांनी घरे बांधली आहेत. या कृत्या विरोधात अनेक निवेदने महसूल विभागाला देऊनही हा अन्याय दूर झालेला नाही. पोलिसांचे ही अत्याचार सुरूच असल्याच्या निषेधार्थ आदिवासी एकता परिषदेच्यावतीने सफाळे पोलीस स्टेशनवर सोमवारी मोर्चा काढला होता.
सफाळे भागातील अनेक आदिवासी जमिनीवर बिगर आदिवासी लोकांनी कब्जा केला असून महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने ही अतिक्र मणे वाढीस लागल्याचा संघटनांचा आरोप आहे. या कार्यक्षेत्रात कार्यरत अनेक तलाठी, सर्कल हे भूमाफियांना सहकार्य करीत असल्याचे दिसून येत असून पैश्याची मागणी करीत आहेत. नुकतेच सफाळे येथील संखे या मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले होते.
सफाळे भागातील कपासे भागातील गट क्र मांक १२० मधील बबन व दशरथ खैराडी, गीता खरपडे, पार्वती पारधी, माणकू हाडळ, सर्व्हे नंबर ७३/अ मधील विनोद लोंढे, चेतन लोंढे, हेमंत लोंढे, सर्व्हे न.२२/१ व २२/४ मधील सतीश किरिकरे, सर्व्हेे न.३८ उंबर पाडा, नंदाडे येथील प्लॉट न.१/८ मधील कृष्णा वरठा, सर्व्हे न.३०४/१ मधील काशीनाथ पिलेना, गणेश पिलेना, सफाळे सरतोंडी येथील सर्व्हे न. १४३ मधील विकास व काशीनाथ शेलका, करवाळे गट न.२/अ मधील रामू व चंद्रकांत दळवी, सोनावे येथील गट न. ३०३ मधील दिनेश बरफ, विराथन खुर्द येथील गट न.६० मधील ललिता हाडळ आदी आदिवासी समाजातील लोकांच्या जमिनीवर जबरदस्तीने अतिक्र मणे करून घरे बांधण्यात आली असून काही जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांना करण्यात आल्या आहेत. या जमिनीचे पुरावे संबंधिता कडे असतानाही जमिनी तर मिळत नाही उलट पोलिसी खाक्या दाखवून दम दिला जात आल्याचे आरोप मोर्चा दरम्यान करण्यात आले. यावेळी अध्यक्ष काळूराम धोदडे, दत्ता करबट, गजानन पागी, डॉ.सुनील पºहाड यांची भाषणे झाली.
मोर्चेकºयांनी निवेदन दिलेले आहे. सदर प्रकार हा महसूल विभागांशी संबंधित आहे.आमच्याशी संबंधित प्रश्न असेल तर योग्य तो न्याय दिला जाईल. -संदीप सानप,
सहा.पोलीस निरीक्षक, सफाळे