शाई प्रकल्पाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:08+5:302021-03-07T04:37:08+5:30

.......... भावली प्रकल्प संथ गतीने - बृहन्मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांची पाणीटंचाई भावली धरणातील पाणीपुरवठ्यामुळे ...

Opposition to the ink project | शाई प्रकल्पाला विरोध

शाई प्रकल्पाला विरोध

Next

..........

भावली प्रकल्प संथ गतीने -

बृहन्मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांची पाणीटंचाई भावली धरणातील पाणीपुरवठ्यामुळे दूर होणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील घोटीजवळ भावली धरणातून ६०.५५ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी डोंगर उतारावरील गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे शहापूरला आणण्यात येणार आहे. याचा फायदा शहापूरच्या एक लाख ६० हजार आदिवासी कुटुंबीयांना होणार आहे. सुमारे दोनशे कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम अद्यापही कासवगतीने सुरू असल्यामुळे या तालुक्यातील पाणीसमस्या गंभीर झाली आहे.

..........

मुमरी प्रकल्पाचे काम संथ गतीने -

भातसा धरणाच्या डाव्या कालव्यासाठी मुमरी या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. शहापूर तालुक्यातील मौजे खैरे या भागातील ११ हेक्टर जमीन संपादित करून त्यावर या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईल. मुमरी धरणाची लांबी एक हजार २४० मीटर इतकी असून उंची ४६ मीटर इतकी आहे. शेती सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी तीन स्वयंचिलत दरवाजे आहेत. तसेच, १२ बाय ६ इतक्या आकाराचे लोखंडी रेडिअल आहेत. या धरणातून सिंचनासाठी ५४ किमीच्या कालव्याद्वारे सुमारे पाच हजार ९०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मुमरी धरणाच्या पाणलोट क्षेत्राखाली ४९५ हेक्टर जमीन बुडणार आहे. त्यात १६३ हेक्टर खासगी जमीन तर ३३२ हेक्टर वनजमीन पाण्याखाली जाणार आहे.

.........

प्रतिक्रिया -

पाणीपुरवठा व सिंचनाच्या दृष्टीने अंबरनाथचे कुशवली व शहापूरचे नामपाडा धरण हाती घेतले. पण, ते काम वनखात्यामुळे रखडले आहे. तर सिंचनभवनाच्या नियंत्रणातील मुमरी प्रकल्पाचे काम सुरू आहे. कोकणभवन येथील विभागीय कार्यालयाच्या उत्तर कोकण विभागात जिल्ह्यातील या मोठ्या प्रकल्पांची माहिती उपलब्ध होईल.

- डी. एस. राठोड, वरिष्ठ अभियंता - लघू पाटबंधारे, कळवा

..................

Web Title: Opposition to the ink project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.