नाल्यात उतरून विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी उघड केली नालेसफाईची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:29 PM2018-05-25T16:29:37+5:302018-05-25T16:29:37+5:30

नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी शुक्रवारी पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी नाल्यात उतरुन क्रिकेट खेळून नालेसफाईच्या कामाची पोलखोल केली.

Opposition leader Milind Patil has exposed Nalaseefi's policeman in the Nallah | नाल्यात उतरून विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी उघड केली नालेसफाईची पोलखोल

नाल्यात उतरून विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी उघड केली नालेसफाईची पोलखोल

Next
ठळक मुद्दे५५ टक्के नालेसफाई झाल्याचा दावानालेसफाईच्या कामात गुंतले अर्थकारण

ठाणे - मान्सूनच्या आगमनाला काही दिवस शिल्लक असतांनाच अद्यापही ठाण्यात नालेसफाईच्या कामाला वेग आला नसल्याची बाब समोर आली आहे. नालेसफाईचा ठाणे महापालिकेकडून केला जाणारा दावा हा किती फोल आहे, हे शुक्रवारी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी नळपाड्यातील नाल्यात उतरुन क्रिकेट खेळून दाखवून दिले.
         ठाणे महापालिका हद्दीत ११९ किमीचे ३०६ नाले आहेत. त्यामध्ये १३ मोठे नाले आहेत. या सर्व नाल्यांची दरवर्षी पावसाळ्यापुर्वी साफसफाई करण्यात येते. नाल्यातील कचऱ्यामुळे पावसाचे पाणी तुंबून आपतकालीन परिस्थिती निर्माण होऊ नये या उद्देशातून ही कामे करण्यात येतात. यंदाही शहरात अशाचप्रकारे नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली असून या कामांचा शुक्र वारी सकाळी विरोधी पक्ष नेते मिलींद पाटील यांनी दौरा केला. या दौयादरम्यान, जिल्ह््याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या किसननगर, साठेनगर, इंदीरानगर या भागांसह नळपाडा, राबोडी भागातील नाले अजूनही कचºयाने तुंबलेले असल्याचे चित्र दिसून आले आहे. येथील नागरीकांच्या म्हणन्यानुसार केवळ वरवर नालेसफाई केली जात असल्याने गाळ आहे, तसाच नाल्यात साचल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी साठेनगर भागातील नाला तुंबून त्याचे पाणी आसपासच्या घरांमध्ये शिरते. असे असतानाही हा नाला आजही कचºयाने भरलेला आहे. या नाल्याची साफसफाई करताना अर्धा कचरा उचलण्यात आला असून अर्धा कचरा अजूनही उचलण्यात आलेला नाही. या नाल्यात प्लॉस्टीक बाटल्या, चपला, जुन्या वस्तु असा कचरा साचलेला असून त्यावर डुक्कर आणि कोंबड्यांचा मुक्त संचार सुरु होता. किसननगर भागातही नाल्यांची सफाई करण्यात आल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले. मात्र, सफाईनंतही या नाल्यांमध्ये कचयाचे ढिग पडल्याचे दिसून आले. इंदीरानगर आणि नळपाडा या दोन नाल्यांमधील कचरा आणि मातीचा गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या नाल्यातील मातीच्या गाळावर विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकूंद केणी, सुहास देसाई यांच्यासह इतरांनी क्रि केट खेळून सत्ताधारी आणि प्रशासनाच्या कारभाराचा वेगळ्या अनोख्या पध्दतीने निषेध केला. नालेसफाई कामांची मुदत संपायला अवघे आठ दिवस शिल्लक राहीलेले असतानाच प्रशासनाकडून ५५ टक्के नालेसफाईचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र नाल्याची परिस्थिती पहाता हा दावा पोकळ ठरल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यंदा पावसाळा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तिवला गेला असतांना सुध्दा ठाण्यात नाल्यांची ही अवस्था असल्याने याला सर्वस्वी प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच नालेसफाईच्या कामांसाठी ठेकेदार नेमून या कामांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतात. त्यानंतरही दरवर्षी नाले तुंबत असल्याने त्यामध्ये अर्थकारण होत असल्याचा गौप्यस्फोटही यावेळी पाटील यांनी केला.


 

Web Title: Opposition leader Milind Patil has exposed Nalaseefi's policeman in the Nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.