ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेससह कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 02:38 PM2021-08-18T14:38:53+5:302021-08-18T14:39:15+5:30

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांकडून कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याचं आश्वासन

Opposition leader pravin darekar meets doctor nurses of global covid hospital | ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेससह कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट

ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेससह कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट

Next

ठाणे : ग्लोबल कोवीड सेंटरमधील डॉक्टर, नर्सेससह इतर कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला गेल्याच्या निषेर्धात बुधवारी रुग्णालयातील या सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. कामावर परत घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सुमारे ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी हे आंदोलनात सहभागी झाले होते. कर्मचार्यांशी  कोणत्याही प्रकारची चर्चा न करता अचानकपणो कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ग्लोबल रुग्णालयात जाऊन आंदोलन करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसची भेट घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. तर पालिका प्रशासनाच्या वतीने तीन दिवसांचा वेळ मागितला असून त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटलमध्ये कोरीनाच्या पहिल्या लाटेपासून कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स आणि नर्स यांची भारती करण्यात आली होती. पहिला आणि दुसऱ्या लाटेमध्ये या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. मात्र आता दुसरी लाट ओसरू लागली असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून अचानकपणे कामावरून कमी करण्याच्या नोटीसा सबंधित कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी देखील अशाच प्रकारे नोटीस न देता या सर्व कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले होते. त्यावेळी देखील अशाच प्रकारे कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन करण्यात आले होते.यावेळी देखील सबंधित ठेकेदाराकडून या सर्व कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले असल्याने काम बुधवारी सकाळपासूनच काम बंद अनोद्लन छेडण्यात आले होते. सुमारे ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स आणि नर्स तसेच वार्डबॉय या आंदोलनात सहभागी झाले होते.

 तर बेमुदत रुग्णालय बंद करू - प्रवीण दरेकर यांचा इशारा 
ग्लोबलमध्ये डॉक्टर्स आणि नर्स यांनी आंदोलन छेडल्यानंतर या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यांनी ग्लोबलमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली. कोरोन काळत या सर्व कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. आता गरज संपली तर अशा प्रकारे यांना काढून टाकणे योग्य नसल्याचे दरेकर यांनी सांगितले. जोपर्यंत कंत्राट सुरु आहे तोपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांना काढण्यात येऊ नये तसेच संबधित एजन्सी बदलण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यासंदर्भात त्यांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याशी देखील चर्चा केली असून तीन दिवसांत यावर काही निर्णय न  झाल्यास पुन्हा या ठिकाणी येणार असून योग्य निर्णय न घेतल्यास बेमुदत संप करून रुग्णालय बंद करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला .तसेच त्यांनी महापालिका प्रशासनालाही यावेळी अल्टीमेंटम देत, ओम साई एजन्सीची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचे सांगत, मेहनत घेणाऱ्यांना वाऱ्यावर सोडणे चुकीचे आहे. त्यांना सामावून घ्या अशीही मागणी केली आहे. तसेच महापालिका प्रशासनास याबाबत एक दिवसाची वेळ दिली आहे.

 प्रशासनाने मागितली तीन दिवसांची मुदत
ग्लोबल हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रवीण दरेकर यांच्या  प्रामुख्याने तीन मागण्या असून यामध्ये त्यांना जोपर्यंत कंत्राट आहे तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येऊ नये, मनमानी पद्धतीने कमी पगार कमी करण्यात येऊ नये तसेच पुढे या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करून घेणे अशा आहेत. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा झाली असून त्यानंतर पालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली असल्याची माहिती यावेळी ग्लोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली आहे.

Web Title: Opposition leader pravin darekar meets doctor nurses of global covid hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.