विरोधी पक्षनेते पहिल्या मजल्यावरच
By admin | Published: April 12, 2017 03:44 AM2017-04-12T03:44:38+5:302017-04-12T03:44:38+5:30
ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या कॅबीनचा मुद्दा अद्यापही सुटत नसल्याचेच चित्र आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी
ठाणे : ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या कॅबीनचा मुद्दा अद्यापही सुटत नसल्याचेच चित्र आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुन्हा कॅबीनसाठी पाहणी केली. शिक्षण मंडळाच्या सभागृहात फार मोठे बदल करणे अपेक्षित असल्याने या कामाला उशिर होण्याची दाट शक्यता लक्षात घेता, पुन्हा तळ मजल्यावरील कॅबीनचा मुद्दा प्रशासनाने विरोधी पक्षनेत्यांकडे उपस्थित केला. परंतु, त्यांनी याला नकार दिला आहे. त्यामुळे अखेरीस शिक्षण मंडळाच्या सभागृहातच म्हणजेच पहिल्या मजल्यावर आता विरोधी पक्षनेत्यांचे कॅबीन असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापालिकेने दुसऱ्या मजल्यावर असलेले विरोधी पक्षनेत्यांचे कॅबीन तळमजल्यावरील काँग्रेसच्या कॅबीनमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तिचे कामही सुरु झाले होते. परंतु, ही कॅबीन स्वीकारणार नसल्याचे पत्र विरोधी पक्षनेत्यांसह राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले होते. त्यानंतरही तिचे काम सुरुच होते. त्यानुसार या संदर्भात महापौर मीनाक्षी शिंदे यांनीदेखील पत्र देऊन दुसऱ्या मजल्यावर शक्य नसल्यास पहिल्या मजल्यावर त्यांना कार्यालय द्यावे,अशी मागणी केली होती. त्यानंतर हा मुद्दा महासभेतही गाजला होता. अखेर पहिल्या मजल्यावर कॅबीन देण्याच्या मुद्यावर एकमत झाले. त्यानुसार मंगळवारी पहिल्या मजल्यावरील शिक्षण मंडळाच्या सभागृहाची पाहणी आयुक्त व विरोधी पक्षनेत्यांनी केली. यावेळी दोन ते तीन प्लॅन प्रशासनाने विरोधी पक्षनेत्यांना सादर केले. परंतु,यामध्ये काही किरकोळ बदल त्यांनी सुचिवले आहेत. तसेच या कॅबीनच्या कामासाठी विलंब होणार असल्याने तळ मजल्यावरील कॅबीनचे काम लवकर पूर्ण होऊ शकते. अशी गळ पुन्हा प्रशासनाने घातली होती. परंतु, त्याला विरोधी पक्षनेत्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला. अखेर आता पहिल्या मजल्यावरच त्यांची कॅबीन असेल. (प्रतिनिधी)
- पहिल्या मजल्यावर कॅबीन देण्याच्या मुद्यावर एकमत झाले. त्यानुसार मंगळवारी पहिल्या मजल्यावरील शिक्षण मंडळाच्या सभागृहाची पाहणी आयुक्त व विरोधी पक्षनेत्यांनी केली. यावेळी दोन ते तीन प्लॅन प्रशासनाने विरोधी पक्षनेत्यांना सादर केले. परंतु, यामध्ये काही किरकोळ बदल त्यांनी सुचिवले आहेत.