पाण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांचे TMC आयुक्तांच्या दालानाबाहेर ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 03:18 PM2021-10-18T15:18:22+5:302021-10-18T15:18:44+5:30

Thane News: कळवा, मुंब्य्रातील नागरीकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सोमवारी विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले

Opposition leaders sit outside the commissioner's office for water | पाण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांचे TMC आयुक्तांच्या दालानाबाहेर ठिय्या आंदोलन

पाण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांचे TMC आयुक्तांच्या दालानाबाहेर ठिय्या आंदोलन

Next

 ठाणे  -  मागील काही दिवसापासून ठाण्यासह शहराच्या इतर भागांना पाण्यासाठी वनवण करावे लागत आहे. त्यातही कळवा, मुंब्य्रातील नागरीकांचे पाण्यासाठी हाल सुरु आहेत. त्यातही अधून मधून जे पाणी येत आहे, ते देखील गढूळ स्वरुपात येत आहे. त्यामुळे कळवा, मुंब्य्रातील नागरीकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सोमवारी विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. तब्बल दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिलेल्या आश्वासनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सध्या एमआयडीसीच्या वतीने जुन्या जलवाहीन्या बदलण्याचे काम सुरु आहे. परंतु ते सुरु असतांना वारंवार जलवाहीनी फुटत असल्याने त्याचा परिणाम कळवा, मुंब्य्रातील नागरीकांना सहन करावा लागत आहे. या भागात पाण्याची समस्या तीव्र स्वरुपात निर्माण झाली आहे. याच पाण्याच्या मुद्यावरुन राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील पाणी पुरवठा सुरळीत केली नाही तर महापालिकेकडे बघावे लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतर या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नसल्याचेच दिसून आले आहे.

दरम्यान पाण्याच्या याच मुद्यावरुन विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी सोमवारी दुपारी १ वाजता महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. जो र्पयत पाण्याच्या समस्येवर तोडगा निघत नाही, तोर्पयत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. पाण्याची समस्या असतांना मुंब्य्रात जे पाणी सोडले जात आहे, ते देखील गढूळ स्वरुपात येत असल्याने तेच गढूळ पाणी घेऊन त्यांनी ठिय्या मांडला होता. अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची मनधरणी केली. त्यानुसार पाण्याचे प्रेशर वाढविण्याबरोबर येथील टाकीच्या समस्या सोडविली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

Web Title: Opposition leaders sit outside the commissioner's office for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.