लेले यांच्या स्वीकृतपदाला पक्षातूनच होतोय विरोध

By admin | Published: March 30, 2017 05:42 AM2017-03-30T05:42:04+5:302017-03-30T05:42:04+5:30

पक्षातील बंड थोपविण्यासाठी शिवसेना आणि भाजपाकडून नाराजांना स्वीकृत पदाचे गाजर दाखविले जात आहे. शिवसेनेकडून अनेक इच्छुकांची

Opposition to Lele's acceptance | लेले यांच्या स्वीकृतपदाला पक्षातूनच होतोय विरोध

लेले यांच्या स्वीकृतपदाला पक्षातूनच होतोय विरोध

Next

ठाणे : पक्षातील बंड थोपविण्यासाठी शिवसेना आणि भाजपाकडून नाराजांना स्वीकृत पदाचे गाजर दाखविले जात आहे. शिवसेनेकडून अनेक इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. तर भाजपाकडून शहर अध्यक्ष संदीप लेले यांचेच एकमेव नाव पुढे येत होते. परंतु, आता त्यांच्या नावाला पक्षातील दुसऱ्या गटाने विरोध करण्यास सुरुवात केली असून, शहर अध्यक्षपद आपल्याकडे वळवून घेण्यासाठी हा गट पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे निवडणूक काळात असलेले गटबाजीचे ग्रहण निवडणुकीनंतरही पहावयास मिळत आहे.
पालिका निवडणुकीमध्ये नाराज झालेल्यांची नाराजी दूर करण्यासाठी सर्वच पक्षांकडून नाराजांना स्वीकृत नगरसेवक पदाचे गाजर दाखवण्यात येत असले तरी भाजपामध्ये यावरून अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. पक्षाचे विद्यमान अध्यक्ष संदीप लेले यांना स्वीकृत नगरसेवकांचे पद देण्याच्या पक्षाच्या हालचालींमुळे एक गट नाराज असल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या काळात या गटाला डावलण्यात आल्याने आता त्याचा वचपा काढण्यासाठीच ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे पक्षाचे शहर अध्यक्ष पद देण्यावरूनही भाजपामध्ये गटबाजी उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
स्थायी समितीसाठी ‘हाता’ची मदत घेऊन अवघे तीन नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाला शिवसेना पक्षाने तारले असून स्वपक्षातील नाराजांना स्वीकृत सदस्यपदाचे गाजर दाखवण्यात येत आहे. यावेळी स्वीकृत सदस्यांची संख्या जास्त होण्याचा दावा करून नाराजांना खुश करण्याचे प्रयत्न सध्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आले आहेत. याच हालचाली आता निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी ठरलेल्या भाजपाकडून सुरू झाल्या असून स्वीकृत नगरसेवक पद कोणाला द्यायचे यावरून पक्षामध्ये मतभेद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या पदासाठी अजून कोण कोण इच्छुक आहेत हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी भाजपाचे विद्यमान अध्यक्ष संदीप लेले यांचे नाव या पदासाठी जवळजवळ अंतिम झाले आहे. लेले यांच्या नेतृत्वाखालीच ठाणे महापालिकेची निवडणूक झाली असल्याने पक्षालादेखील समाधानकारक यश मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे लेले यांना सभागृहात पाठवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, त्यांच्या नावाला पक्षातीलच एका गटाचा विरोध असल्याने यावरून पक्षात मतभेद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
लेले यांच्या कामाबाबत अनेकांच्या तक्रारी पक्षाकडे आलेल्या आहेत. तसेच त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरदेखील अनेकांनी नाराजी व्यक्त केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच निवडणुकीत ज्या गटाला दाबण्यात आले होते, तो गट आता पुन्हा पेटून उठण्याची चिन्हे असून सह्यांची मोहीम झाल्यानंतर लेले यांच्या विरोधातील पत्र श्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे.
दुसरीकडे अध्यक्षपदावरूनदेखील भाजपामध्ये दोन गट निर्माण झाले असून आपल्याच गटाकडे अध्यक्षपद मिळावे यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरूनदेखील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)

अध्यक्षपदावरून भाजपात दोन गट
लेले यांच्या कामाबाबत समाधानी नसणाऱ्यांनी एक मोहीम उघडली असून, नाराज असणाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचे काम सध्या वेगात आहे. याबाबत भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता त्यांनी सह्यांच्या मोहिमेबाबत तरी काही माहीत नसल्याचे सांगितले.
दुसरीकडे अध्यक्षपदावरूनदेखील भाजपामध्ये दोन गट निर्माण झाले असून आपल्याच गटाकडे अध्यक्षपद मिळावे यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरूनदेखील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: Opposition to Lele's acceptance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.