एक देश एक शिधावाटप पत्रिकेस मराठी एकीकरण समितीचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 10:46 PM2019-12-09T22:46:29+5:302019-12-09T22:47:08+5:30

केंद्र शासनाच्या एक देश एक शिधावाटप पत्रिका धोरणाला मराठी एकीकरण समितीने विरोध दर्शवला आहे.

Opposition of the Marathi Integration Committee to a Rashtrapati Magazine | एक देश एक शिधावाटप पत्रिकेस मराठी एकीकरण समितीचा विरोध

एक देश एक शिधावाटप पत्रिकेस मराठी एकीकरण समितीचा विरोध

Next

मीरा रोड - केंद्र शासनाच्या एक देश एक शिधावाटप पत्रिका धोरणाला मराठी एकीकरण समितीने विरोध दर्शवला आहे. त्या निषेधार्थ काशिमीरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्या जवळ धरणे आंदोलन धरले होते. केंद्र शासनाने राज्य शासनाच्या अखत्यारीत असणाराया शिधावाटपाचा अधिकार काढून घेण्याचा घाट घातला आहे.

एक देश एक शिधावाटप पत्रिका धोरणा मुळे अन्य राज्यां मधुन येणाराया लोंढ्यांना आणखी प्रोत्साहन मिळून महाराष्ट्रावरील ताण आणखीन वाढणार आहे. अन्य राज्यातील नागरिकांना देखील या धोरणामुळे महाराष्ट्रात शिधावाटप दुकानातून धान्य आदी मिळणार आहे. आधीच राज्यातील नागरिकांना पुरेसे रेशन मिळत नसताना बाहेरून येणा-या लोंढ्यांमुळे आणखी बिकट स्थिती होणार असल्याचे मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख म्हणाले. राज्य शासनाने देखील या धोरणाला विरोध केला पाहिजे, अशी मागणी प्रदीप सामंत यांनी केली. यावेळी सचिन घरत, कृष्णा जाधव, सचिन मांजरेकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Opposition of the Marathi Integration Committee to a Rashtrapati Magazine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.