मजल्यावरील सर्वांना क्वारंटाइन करण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 01:35 AM2020-07-27T01:35:10+5:302020-07-27T01:35:50+5:30

नागरिकांचा आक्षेप : बाधितांनाच दाखल करण्याची मागणी

Opposition to quarantining everyone on the floor | मजल्यावरील सर्वांना क्वारंटाइन करण्यास विरोध

मजल्यावरील सर्वांना क्वारंटाइन करण्यास विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाचा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सोसायटीतील त्याच्या मजल्यावरील अथवा चाळीतील शेजाऱ्यांनाही तपासणी, उपचारांसाठी केडीएमसीच्या विविध कोविड सेंटरवर नेले जात आहे. तसेच त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल होण्यास
सांगितले जात असल्याने त्याला शहरातील नागरिकांनी विरोध केला आहे.
खंबाळपाडा येथे राहणारे अक्षय फाटक यांनी मनपाच्या या भूमिकेला विरोध केला असून, आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या घरातील सगळ्यांची चाचणी होणे गरजेचे आहे. परंतु, त्याच्या मजल्यावरील शेजाऱ्यांनाही अ‍ॅडमिट करून घेणे, चाचणी करायला
लावणे, याला विरोध असल्याचे ते म्हणाले. संगीतावाडीतील रहिवासी व डोंबिवली नाभिक महामंडळाचे पदाधिकारी रमेश राऊत यांनीही मनपाच्या धोरणाचा विरोध केला आहे. मनपा हे योग्य करत नाही. यामुळे रहिवाशांमध्ये आपापसांत भांडणे होतील. तसेच संपूर्ण मजला, चाळ त्यामुळे टार्गेट करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
रुग्णाच्या मजल्यावरील सगळ्यांची चाचणी करावी, ज्यांना त्रास असेल त्यांनाच उपचारांसाठी हलवावे, पण सरसकट सगळ्यांना हलवणे हे योग्य नाही. त्याला विरोध असल्याचे नगरसेवक नितीन पाटील म्हणाले. आयुक्तांनी नगरसेवकांच्या बैठकीत प्रत्येक प्रभागात एक रुग्णवाहिका असेल, असे म्हटले होते. प्रभाग समितीला पाच रुग्णवाहिका दिल्या जातील, असे म्हटले होते. त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. पाटील हे सध्या त्यांच्या प्रभागात विनामूल्य आॅक्सिजन पुरवत आहेत. दिवसाला सात जणांना त्याची गरज लागत असून मागणीत वाढ होत आहे. सिलिंडर घेणे, त्यात आॅक्सिजन रिफिल करणे, हे खर्चिक असते. ते सामान्यांना परवडणारे नाही, याचीही पालिकेने दखल घ्यावी, असे ते म्हणाले.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने काही ठोस निर्णय घ्यावे लागले आहेत. त्यात हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट असे वर्गीकरण करून संबंधित नागरिकांना आयसोलेशन सेंटरमध्ये आणले जात आहे. त्यामध्ये सोसायटीतील एखाद्या मजल्यावरील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील बहुतांश जणांना तातडीने आयसोलेशन सेंटरमध्ये आणले जात असून, काहीशी सक्ती करणे अत्यावश्यक झाले आहे. पॉझिटिव्ह रुग्ण असूनही नागरिक ऐकत नाहीत म्हटल्यावर हे पाऊल पालिकेला उचलावे लागले.
- प्रतिभा पानपाटील,
मुख्य आरोग्य अधिकारी, केडीएमसी

Web Title: Opposition to quarantining everyone on the floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.