‘समृद्धी’ला विरोध मावळला, कल्याण तालुक्यात जमीन देण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:40 AM2017-12-05T00:40:40+5:302017-12-05T00:43:42+5:30

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनास कल्याण तालुक्यातील शेतकरी तयार झाले आहेत. निंबवली येथील शेतकरी राघुबाई पाटील यांनी त्यांची ५६ गुंठे जमीन सोमवारी सरकारला दिली.

Opposition to 'Samrudhi' started, giving land to Kalyan taluka started | ‘समृद्धी’ला विरोध मावळला, कल्याण तालुक्यात जमीन देण्यास सुरुवात

‘समृद्धी’ला विरोध मावळला, कल्याण तालुक्यात जमीन देण्यास सुरुवात

Next

टिटवाळा : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनास कल्याण तालुक्यातील शेतकरी तयार झाले आहेत. निंबवली येथील शेतकरी राघुबाई पाटील यांनी त्यांची ५६ गुंठे जमीन सोमवारी सरकारला दिली.
कल्याण तालुक्यातील उशीद, फळेगाव, दानबाव, उतणे, नडगाव, पितांबरेपाडा, चिंचवली, राया, निंबवली, गुरवली या गावांतील १०८ हेक्टर जमीन समृद्धी महामार्गात बाधित होत आहे. त्यामुळे शेतजमिनी न देण्यासाठी संघर्ष समिती आणि शेतकरी यांनी अनेकदा तीव्र विरोध केला होता.
परंतु, राज्य सरकारकडून बाधित शेतकºयांना २८ नोव्हेंबरपासून जमिनीच्या भावाचा गुणांक एकऐवजी दोन दिला जात आहे. त्यामुळे अडीचपटीचा भाव एकदम पाचपट झाला आहे. प्रतिहेक्टरनुसार निंबवलीत एक कोटी ५५ लाख रुपये, राया येथे तीन कोटी एक लाख, गुरवली आणि चिंचवलीत दोन कोटी ३३ लाख, पितांबरे येथे एक कोटी २२ लाख, नडगाव येथे एक कोटी २६ लाख, उशीद येथे एक कोटी ७३ लाख रुपये दर सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास तयार झाले आहेत. त्यासाठी त्यांनी सोमवारी सकाळपासूनच कल्याण येथील दुय्यम सहनिबंधक कार्यालयात गर्दी करत खरेदीखत करण्यास सुरुवात केली आहे.
मोठ्या प्रमाणात शेतकरी खरेदीखतासाठी तयार झाले आहेत, अशी उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे व तहसीलदार अमित सानप यांनी दिली.

Web Title: Opposition to 'Samrudhi' started, giving land to Kalyan taluka started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.