उल्हासनगर महापालिकेवर संघर्ष समितीचा मोर्चा, विकास आराखड्यातील रिंग रोड व शाळा-झोपडपट्टीवरील कबरस्थानला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 03:57 PM2017-12-16T15:57:03+5:302017-12-16T15:57:33+5:30
शहर विकास आराखडा विरोधात संघर्ष समितीने महापालिकेवर हजारोच्या संख्येने मोर्चा काढला.
उल्हासनगर : शहर विकास आराखडा विरोधात संघर्ष समितीने महापालिकेवर हजारोच्या संख्येने मोर्चा काढला. आरक्षित भूखंडा ऐवजी शाळा व झोपडपट्टीवर टाकलेले कबरस्थान, झोपडपट्टीतून जाणारा रिंग रोड, या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आहे.
उल्हासनगर शहर विकास आराखडा गेल्या महिन्याच्या शेवटी प्रसिद्ध झाला. दोन विभागात प्रसिद्ध झालेल्या विकास आराखडायाला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. तर झोपडपट्टी विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पहिल्या विभागात फक्त पालिका महासभेत प्रस्ताव मंजूर करून, राज्य शासनाकडे पाठविण्याचा अधिकार नगरसेवकाकडे आहे. तर दुसऱ्या विभाग हरकत व सूचना मांडू शकतो. त्यासाठी कोकण विभाग नगररचनाकर संचालक कार्यालयात नगरसेवक व नागरिकांना जावे लागणार आहे. विकास आराखडा, विकासा ऐवजी झोपडपट्टीवरून बुलडोजर फिरवणार असल्याचा आरोप विरोधी पक्षातील शिवसेना, रिपाइं, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप, पीआरपी, मनसे, आदी पक्षांनी केला.
शहरातील झोपडपट्टीवरून रिंग रोड जात असून हजारो नागरिक बेघर होणार आहेत. या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. कॅम्प नं 3, सम्राट अशोकनगर येथील झोपडपट्टी व मराठी शाळेवर चक्क कबरस्थान टाळले. खुल्या भूखंडा ऐवजी झोपडपट्टी व शाळेवर कबरस्थान टाकल्याच्या निषेधार्थ महादेव सोनावणे, शिवाजी रगडे, प्रल्हाद गायकवाड, गौतम ढोके, जमील खान, नगरसेवक गजानन शेळके, सविता तोरणे, माजी नगरसेवक इशरत खान, दशरथ चोधरी, फिरोज खान, शालिनीताई गायकवाड आदींनी संघर्ष समिती स्थापन केली. 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या विशेष महासभेच्या दिवासी धडक मोर्चा काढला.