ग्रामस्थांचा विरोध मावळला; कचऱ्याचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:21 AM2019-01-30T00:21:52+5:302019-01-30T00:22:12+5:30

बायोगॅस प्रकल्प राबविण्याचे आश्वासन

The opposition of the villagers The problem of garbage will be solved | ग्रामस्थांचा विरोध मावळला; कचऱ्याचा प्रश्न सुटणार

ग्रामस्थांचा विरोध मावळला; कचऱ्याचा प्रश्न सुटणार

Next

बदलापूर : कुळगाव-बदलापूर पालिकेच्या घंटागाडी कचरा टाकण्यासाठी साई वालवली गावाजवळील डम्पिंग ग्राऊंडवर जात होत्या. मात्र या ठिकाणी असलेल्या डम्पिंगचा त्रास होत असल्याचे कारण देत नवीन वडवली आणि नवीन अंबरनाथ गावातील ग्रामस्थांनी बदलापूर पालिकेच्या घंटागाड्या अडवत कचरा टाकण्यास बंदी घातली. या प्रकरणी अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात वादावादीही झाली. मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी आणि माजी नगराध्यक्ष यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच त्यांची समजूत घालून कचरा टाकण्यासाठी केलेला विरोध क्षमविण्यात यश मिळविले.

नवीन अंबरनाथ गावाला लागूनच बदलापूर पालिकेचे डम्पिंग ग्राऊंड आहे. या डम्पिंगचा धूर आणि दुर्गंधीचा त्रास होत असल्याने साई ग्रामपंचायत हद्दीतील नवीन अंबरनाथ गावातील ग्रामस्थांनी घंटागाडी रोखत आंदोलन केले होते. एकही घंटागाडी डम्पिंगवर जाऊ देणार नाही अशी ठाम भूमिका या ग्रामस्थांनी घेतली होती. त्यामुळे बदलापूरमध्ये कचरा कोंडी निर्माण झाली होती. या कचराकोंडीमुळे बदलापूर पालिका प्रशासन या ग्रामस्थांबरोबर चर्चा करण्यात व्यस्त होते. सोमवारी झालेली चर्चा अपयशी ठरल्यावर पुन्हा मंगळवारी स्वता मुख्याधिकारी प्रकाश बोरसे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी स्थानिक ग्रामस्थांसोबत चर्चा केली.

डम्पिंगच्या होणाºया त्रासाची माहिती ग्रामस्थांनी अधिकाºयांना दिली. यावर पालिकेच्या मुख्याधिकाºयांनी डम्पिंगवरील कचरा कमी करण्यासाठी शहरात विविध प्रकल्प राबवित असल्याची माहिती दिली. शहरात अनेक ठिकाणी सोसायटीमध्येच कचºयावर प्रक्रिया केली जात आहे. तर उर्वरित कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका प्रशासन बागोगॅस प्रकल्प राबविणार असल्याचे स्पष्ट केले. हा प्रकल्प सुरू झाल्यावर ओल्या कचºयावर प्रक्रिया करून तो कचरा तिथेच नष्ट केला जात असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. हा कचरा नष्ट झाल्यावर डम्पिंगवर त्याचा कोणताही ताण पडणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र तरीही ग्रामस्थ पालिकेच्या या निर्णयावर समाधानी नव्हते.

बोरसे यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष म्हात्रे यांनीही कचºयावरील प्रक्रिया केंद्राची माहिती ग्रामस्थांना दिली. तसेच भविष्यात त्याचा कोणताही त्रास होणार नसल्याची ग्वाही देण्यात आली. सोबत गावातील ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. गावातील विकासकामांबाबतही पालिका प्रशासन सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या सर्व प्रक्रियेसाठी महिन्याभराची मुदतही ग्रामस्थांनी दिली आहे. महिन्याभरात समाधानकारक कामे न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पालिका प्रशासनाची कसोटी
डम्पिंगच्या त्रासाच्या विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले असताना या गावातील मुख्य नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला काय करता येईल याचा विचार आता सुरु झाला आहे. ग्रामस्थांना पालिकेच्या प्रकल्पाची कल्पना दिल्याने त्यांचा राग शांत झालेला असला तरी त्यांना देण्यात आलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास त्याचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने आता डम्पिंग आणि कचरा प्रक्रिया केंद्राच्या बाबतीत आपली तत्परता दाखविण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: The opposition of the villagers The problem of garbage will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.