आणखी तीन वाहनतळ निर्माण करण्याचे आदेश; ट्रक टर्मिनस करण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 12:50 AM2020-01-18T00:50:58+5:302020-01-18T00:51:20+5:30
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी पार्किंगच्या विषयावर बोलताना, शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे
ठाणे : घोडबंदरपट्ट्यात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने वागळे, घोडबंदर आणि बाळकुम या तीन ठिकाणी वाहनतळ निर्माण करण्याचे आदेश ठामपा स्थायी समिती बैठकीत सभापती राम रेपाळे यांनी शुक्रवारी दिले. त्याचबरोबर माजिवडा आणि वागळे इस्टेटला ट्रक टर्मिनस करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पार्किंगसाठी महापालिकांच्या आरक्षणाबरोबरच एमआयडीसीच्या जागेबाबतही विचारणा करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी पार्किंगच्या विषयावर बोलताना, शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. अनेक रस्ते हे काँक्रिटचे झाले आहेत. मात्र, या सर्व रस्त्यांवर, विशेषकरून घोडबंदर आणि बाळकुम परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली असून, या गृहसंकुलांनी आपल्या पार्र्किं गची व्यवस्था केली आहे. ठाण्यात अशा मोठ्या गृहसंकुलांना बांधकाम परवानगी देताना पार्किंगची अट टाकली जाते का, आदी मुद्दे उपस्थित केले. यावर उत्तर देताना, प्रशासनाने फ्लॅटच्या कार्पेट रेटप्रमाणे उपलब्ध फ्लॅटच्या प्रमाणात पार्किंग उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे सांगितले. त्याचवेळी भोईर यांनी किती पार्किंग उपलब्ध झाले, याची माहिती पुढच्या स्थायी समितीमध्ये सादर करावी, अशी मागणी केली.
बाळकुमचे प्रसूतिगृह, आरोग्य केंद्र धोकादायक
ठामपाचे बाळकुम येथील प्रसूतिगृह आणि आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक आहे. या इमारतीची किरकोळ डागडुजी करून तेथे कारभार सुरू असल्याचे सांगत नगरसेवक संजय भोईर यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
बाळकुम आरोग्य केंद्रात बाळकुम, मनोरमानगर, ढोकाळी, कोलशेत, कासारवडवली ते अगदी वाडा, मोखाडा, भिवंडी, काल्हेर, कशेळी, पूर्णा येथूनही रु ग्ण येथे दररोज उपचारासाठी येत असतात. त्यांच्यावर येथील दोन डॉक्टर उपचार करतात. दुसरीकडे पहिल्या मजल्यावरील प्रसूतिगृहाची स्थिती याहून वेगळी नाही. त्यामुळे या केंद्राची दुरु स्ती किंवा ते इतरत्र कधी हलवणार, असा प्रश्न भोईर यांनी केला.