अंबरनाथ नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 07:09 PM2017-12-05T19:09:22+5:302017-12-05T19:26:31+5:30
पालिका कार्यालयाच्या मागे सुरु असेल्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी केली. इमारतीचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश नगराध्यक्षा वाळेकर यांनी अधिका-यांना आणि काम करणा-या कंपनीला दिले आहेत.
अंबरनाथ - दिवसभर पावसामुळे पालिकेत शुकशुकाट पसरलेला असतांना नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता पालिकेतील सर्व विभागांची पाहणी केली. कोणते अधिकारी कोठे आहेत याची माहिती घेतली. तसेच पालिका कार्यालयाच्या मागे सुरु असेल्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी त्या थेट इमारतीच्या ठिकाणी गेल्या. यावेळी अधिका-यांनी कामाची माहिती नगराध्यक्षांना दिली. या इमारतीचे संपरूण काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश नगराध्यक्षा वाळेकर यांनी अधिका-यांना आणि काम करणा-या कंपनीला दिले आहेत.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरु असुन या कामाची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्षा स्वत: कोणालाही कल्पना न देता जागेवर आल्या. यावेळी प्रकल्प अधिकारी राजेंद्र हावळ यांनी नगराध्यक्षा वाळेकर यांना प्रशासकीय इमारतीची आणि त्याच्या बांधकामाची माहिती दिली. कामाचा वेग मंद असला तरी कामाचा दर्जा योग्य राखण्यात येत असल्याचे यावेळी अधिका-यांनी सांगितले. ठेकेदाराला दिलेल्या मुदतीच्या आधीच इमारतीचे काम पूर्ण करण्याचा संकल्प अधिका-यांनी ठेवला आहे. वाळेकर यांनी इमारतीच्या बांधकामाची पाहणी केल्यावर या इमारतीचे काम करणा-या कंपनीच्या अधिका-यांना आरसीसीचे बांधकाम मार्च र्पयत पूर्ण करण्याचे आणि उर्वरित काम दिवाळीच्या आधी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. दिवाळीच्या आसपास पालिकेचे कामकाज नव्या इमारतीतुन होईल या अनुशंगाने कामाला वेग देण्याचे आदेश दिले आहे.
इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्यापूर्वी वाळेकर यांनी पालिकेतील प्रत्येक विभागाची माहिती स्वत: जाऊन घेतली. कोणते अधिकारी कार्यालयात आहेत कोणते अधिकारी नाहीत याची माहिती घेतली. तसेच कार्यालयातील वातावरण आणि सुविधांबाबत माहिती घेत काही सुधारणा त्यांनी सुचविले आहेत. अगिनशमन केंद्राची पाहणी करित सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती घेतली. नगराध्यक्ष कार्यालयामना भेट देत असल्याचे लक्षात येताच बाहेर गेलेले अधिकारी देखील आप आपल्या कार्यालयात सक्रिय झाले.