खारभूमीची जमीन क्लस्टरसाठी देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:39 AM2021-03-25T04:39:17+5:302021-03-25T04:39:17+5:30

ठाणे : ठाण्यातील खारभूमीची जमीन क्लस्टरसाठी देण्यात येणार असून क्लस्टर योजनेला गती देण्याकरिता याबाबतची प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी, असे ...

Order of Guardian Minister to give saline land for cluster | खारभूमीची जमीन क्लस्टरसाठी देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

खारभूमीची जमीन क्लस्टरसाठी देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Next

ठाणे : ठाण्यातील खारभूमीची जमीन क्लस्टरसाठी देण्यात येणार असून क्लस्टर योजनेला गती देण्याकरिता याबाबतची प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी प्रशासनाला दिले.

ही बैठक नेपियन्सी रोड येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे मंगळवारी संपन्न झाली. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, ठाणे जिल्ह्याचे नगररचना उपसंचालक अशोक पाटील व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. क्लस्टर प्रकल्पातील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्याबाबत अधिक माहिती देताना शिंदे म्हणाले की, ठाणे येथील जलसंपदा विभागाचे कार्यालय व खारभूमी विभागाची जमीन याचा क्लस्टरअंतर्गत पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने संबंधित विषयाचा आढावा घेऊन प्रस्ताव ठाणे महापालिकेने एमएसआरडीसीकडे सादर करावा. तसेच संबंधित जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्विकासाचा प्रश्न पहिल्यांदा सोडवा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

........

वाचली

Web Title: Order of Guardian Minister to give saline land for cluster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.