श्रीमलंगच्या विकासासाठी १० कोटींचा आराखडा सादर करण्याचे आदेश
By admin | Published: April 26, 2017 12:24 AM2017-04-26T00:24:54+5:302017-04-26T00:24:54+5:30
श्रीमलंग गडावर दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मात्र, त्या तुलनेत येथे पुरेशा सोयीसुविधा नसल्यामुळे श्री मलंग परिसर विकासासाठी १० कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
ठाणे : श्रीमलंग गडावर दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मात्र, त्या तुलनेत येथे पुरेशा सोयीसुविधा नसल्यामुळे श्री मलंग परिसर विकासासाठी १० कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच, येथे होणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी अडविण्यासाठीही स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
श्रीमलंग गडाचा समावेश राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकासाच्या ‘ब’ गटात केला आहे. त्यामुळे या परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद तसेच वन विभागाकडे अनेक बैठकाही त्यांनी घेतल्या. मात्र, वन विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या कार्यक्षेत्रातील वादामुळे या परिसराचा विकास रखडला होता.
सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत खासदारांनी यासंदर्भात होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सातत्याने पाठपुरावा करूनदेखील प्रशासकीय पातळीवर उदासीनता दाखवली जात असल्याची तक्र ार त्यांनी केली. श्रीमलंग गड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे, तसेच येथे पर्यटन विकासालाही भरपूर वाव आहे. लवकरच येथे फ्युनिक्युलर रेल्वेही सुरू होत असून त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत आणखी भर पडेल. (प्रतिनिधी)