चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल रिकामी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 12:23 AM2019-11-07T00:23:24+5:302019-11-07T00:23:38+5:30

‘महा’चा संभाव्य तडाखा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Order to vacate the hotel in the wake of the cyclone | चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल रिकामी करण्याचे आदेश

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल रिकामी करण्याचे आदेश

Next

ठाणे : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाºयालगत असलेले हॉटेल, रिसॉर्ट खाली करण्यात यावेत. तसेच, या हॉटेल आणि रिसॉर्टचे बुकिंग ६ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत घेऊ नये, अशा सक्त सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. ‘महा’चक्र ीवादळाच्या वाढत्या शक्यतेने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. चक्रीवादळाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि उपाययोजना, पूर्वतयारीसाठी कर्मचाऱ्यांच्या नियोजित सुट्या रद्द केल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची पूर्वतयारी सुरू केली असून, संबंधित सर्वच कार्यालयांच्या प्रमुखांना लेखी सूचना पाठविल्या आहेत. संबंधित परिसरातील नोडल अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. तसेच अधिकारी यांची सर्व माहिती सादर करावी. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवावे. विभागाला देण्यात आलेल्या आपत्कालीन यंत्रसामग्री लाइफ जॅकेट, लाइफ बायझ, रिंग्स, रबरी होड्या यांच्या तपासण्या करून त्या जय्यत तयारीत ठेवाव्या तसेच यांत्रिक बोटी, छोट्या होड्या या खाजगी असलेल्या उपलब्ध कराव्यात. सध्या उपलब्ध असलेल्या बोटींची तपासणी करणे अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, ग्रामपंचायतीच्या सर्वच कर्मचाºयांना चक्र ीवादळाबाबत दवंडी देऊन जनजागृती करणे, नागरिकांची माहिती देऊन मानसिकता वाढविणे याची दखल घेण्याचे आदेश लेखी जारी करण्यात आलेले आहेत. समुद्री किनाºयालगतच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाºयांनी यंत्रसामग्रीची संख्या मोजमाप करावी. त्याचप्रमाणे किनाºयालगतच्या ग्रामपंचायत समितीने गावात किती लोक राहतात, याची आकडेवारी ठेवावी. चक्रीवादळाबाबत जिल्हा प्रशासनाने लेखी सूचना सर्व पालिका, नगरपालिका यांच्यासह सर्वच ग्रामपंचायती आणि किनाºयालगतच्या ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

सरकारीसह खासगी दवाखाने सतर्क असावेत
कदाचित जर चक्रीवादळाच्या परिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करावयाचे असल्यास त्यांची निवारा, खाणेपिणे आणि औषधे यांची व्यवस्था करण्यात यावी. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्यकेंद्राने आपल्या रु ग्णालयात औषधांचा पुरवठा ठेवावा. सर्व सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमध्ये प्रथमोपचार गट आणि आवश्यकतेनुसार रु ग्णवाहिका आणि इतर सुविधा तैनात ठेवाव्यात.

शाळा-महाविद्यालये बद ठेवावीत
संभावित चक्रीवादळाच्या कालावधीत शिक्षण अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार शाळा, कॉलेज बंद ठेवावीत आणि विद्यार्थ्यांना संरक्षण द्यावे. सरकारी आणि निमसरकारी अशा सर्वच कार्यालयांच्या प्रमुखांना जिल्हा प्रशासनाने सूचना आणि संकटाशी सामना करण्यासाठी आवश्यक त्या सूचना केलेल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

तटरक्षक दलाने घ्यावयाची काळजी : तटरक्षक दलाला केलेल्या सूचनांत समुद्रात कामानिमित्त किंवा मच्छीमारीसाठी गेलेल्या सर्व बोटींना परतीच्या प्रवासाच्या सूचना द्याव्यात, गरजेनुसार सर्व बोटींना आवश्यक त्या सुविधा पुरविणे, मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटींना सुरक्षित किनाºयावर आणावे, तटरक्षक दलाने डायव्हर्स टीम तैनात ठेवावी, त्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला देण्यात यावी.

Web Title: Order to vacate the hotel in the wake of the cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.