घरांवर लावलेल्या पाट्या काढण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:55 AM2021-02-20T05:55:04+5:302021-02-20T05:55:04+5:30
ठाणे : शेल्टर असोसिएटस्ला आमचा महत्त्वाचा डाटा गोळा करण्याचे अधिकार कोणी दिले. त्यातही या संस्थेने आतापर्यंत शहरात अधिकची शौचालये ...
ठाणे : शेल्टर असोसिएटस्ला आमचा महत्त्वाचा डाटा गोळा करण्याचे अधिकार कोणी दिले. त्यातही या संस्थेने आतापर्यंत शहरात अधिकची शौचालये उभारली असल्याचा दावा केला असून, तो दावादेखील खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आम्हाला लोकमान्यनगर भागात गुगल प्लस कोड नको, त्याठिकाणी लावलेल्या पाट्या काढून टाका, अशी मागणी त्यांनी लावून धरली. यासंदर्भात उपायुक्त मनीष जोशी यांनी गुगल प्लस कोड घेतला नाही तरीदेखील संस्थेमार्फत मोफत शौचालये बांधून दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
अखेर महापौर नरेश म्हस्के यांनी प्रस्ताव मंजूर न करताच सर्व्हे कसा सुरू केला, असा सवाल प्रशासनाला केला, तसेच या भागात लावलेल्या पाट्याही काढून टाकाव्यात, ज्यांच्या प्रभागात याची गरज आहे, जे नगरसेवक मागणी करतील त्याठिकाणीच सर्व्हे करा, असे आदेशही त्यांनी दिले.