संस्थेला सरकारकडून अद्याप अनुदान नाही, सिंधुताई सपकाळ यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 11:58 PM2020-03-04T23:58:33+5:302020-03-04T23:58:39+5:30

अनाथ मुलांना एकत्र आणून त्यांचा सांभाळ करण्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहे.

The organization is yet to receive a grant from the government, says Sindhutai Sapakal | संस्थेला सरकारकडून अद्याप अनुदान नाही, सिंधुताई सपकाळ यांची खंत

संस्थेला सरकारकडून अद्याप अनुदान नाही, सिंधुताई सपकाळ यांची खंत

Next

अंबरनाथ : अनाथ मुलांना एकत्र आणून त्यांचा सांभाळ करण्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहे. यासाठी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान झाले. पण अद्याप सरकारकडून अनुदान मात्र मिळाले नाही. सरकारने द्यावे, मी मागणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी केले.
अंबरनाथ येथील प्रेरणा सामाजिक संस्था आणि भाजप महिला मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस सरिता चौधरी यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्र म झाला. जागतिक महिला दिन केवळ एक दिवस करून चालणार नाही. सध्या कुटुंबांमध्ये ताणतणावाचे प्रमाण वाढले आहे. त्यातून सोडचिठ्ठी देण्यासारख्या घटनाही वाढू लागल्या आहेत. याऐवजी तडजोड करायला शिका, असे त्या म्हणाल्या.
सन्मान आणि पुरस्कारातून भाकरी मिळत नाही. अनाथालयातील मुलांसाठी भाकरी मिळवण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरु असल्याचे सिंधुताई यांनी सांगितले.

Web Title: The organization is yet to receive a grant from the government, says Sindhutai Sapakal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.