भांडवलशाही व्यवस्थेविरोधात संघटन आवश्यक, प्रा.डॉ. वंदना सोनाळकर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 06:31 AM2017-10-16T06:31:07+5:302017-10-16T06:31:37+5:30

शिक्षण, आरोग्य, रेशनिंगची व्यवस्था व पर्यावरणाचा नाश हे भांडवलशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. त्याविरुद्ध प्रचार-प्रसार व संघटन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.

 Organizational needs against capitalism system, prof.d. Vandana Sonalkar's opinion | भांडवलशाही व्यवस्थेविरोधात संघटन आवश्यक, प्रा.डॉ. वंदना सोनाळकर यांचे मत

भांडवलशाही व्यवस्थेविरोधात संघटन आवश्यक, प्रा.डॉ. वंदना सोनाळकर यांचे मत

Next

ठाणे : शिक्षण, आरोग्य, रेशनिंगची व्यवस्था व पर्यावरणाचा नाश हे भांडवलशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. त्याविरुद्ध प्रचार-प्रसार व संघटन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.
लोकवाङ्मयगृह व ठाणे मतदाता जागरण अभियानतर्फे शनिवारी शिरीष मेढी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त ‘जागतिक अर्थकारण, पर्यावरण व भारत’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या वेळी संजीव चांदोरकर यांच्या ‘अर्थाच्या दाहीदिशा’ या पुस्तकाचे प्रकाशन कॉ. एम.ए. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सोनाळकर म्हणाल्या की, पूर्वी विषमतेची चर्चा होत होती, पण आज विषमता वाढूनही त्याची जागतिक पातळीवरही चर्चा होत नाही. सरकार स्वत:ला कल्याणकारी म्हणवत असतानाही, विविध योजनांवर खर्च कमी करत आणले जात आहेत. भांडवलशाहीच्या अतिरेकामुळे विषमता वाढीस लागणार, हे सर्वांना माहीत होते, तरीही त्याचाच पुरस्कार जगभर होतो आहे. या विषमतावादी स्थितीचे दोन जग निर्माण झाले आहेत. यात मानवतावादी विचारही मागे पडत आहेत. मूल्य बदलली जात आहेत. नवीन बेदरकार संस्कृती निर्माण होत आहे.
पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे म्हणाले, निसर्गातील कार्बन सायकल सुदृढ राहिली तरच पर्यावरण वाचेल. अन्यथा, पृथ्वीचे अस्तित्व संपुष्टात येईल. वातावरण बदलामुळे आदिवासी समूहांचे कुपोषण वाढले आहे. विकास व पर्यावरण ही दोन चाके आहेत. यात सध्या विकासाचे एकच चाक मोठे करण्याचा कार्यक्र म सुरू आहे. यामुळे हा रथ कोसळणार आहे. शहर विकास करताना गाड्या वाढतात व वनसंपत्ती नष्ट होते; पण यावर कोणी विचार करत नाही. शेती व शेतकरी यांचे आयुष्य पर्यावरण नाशामुळे संकटात आले आहे.
सध्या जगभर विकासाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. ती आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे काय बदल घडतात, याचा अभ्यास कोण करतेय का? यात मूल्येही बदलत आहेत, हेही लक्षात घ्यावे, असे डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले. या वेळी मेढी व चांदोरकर यांनीही मते व्यक्त केली.

Web Title:  Organizational needs against capitalism system, prof.d. Vandana Sonalkar's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.