भिवंडीत आगरी महोत्सवाचे आयोजन; ग्रामीण भागाचा देखावा उभारणार
By नितीन पंडित | Published: January 24, 2023 08:03 PM2023-01-24T20:03:46+5:302023-01-24T20:04:00+5:30
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात क्रीडांगण परिसरात ग्रामीण गावाचा देखावा उभारण्यात येईल.
भिवंडी - ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र म्हणून ओळख असलेल्या आगरी समाजाची संस्कृती,परंपरा नव्या पिढी पर्यंत पोहचविण्यासाठी २६ ते ३० जानेवारी दरम्यान भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगणावर आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.या प्रसंगी आयोजन समितीचे पदाधिकारी सोन्या पाटील,संतोष पाटील,अमर म्हात्रे,योगेश गुळवी,हनुमान पाटील, संतोष म्हात्रे ,हेंदर पाटील ,हरिश्चंद्र पाटील, राजेश पाटील ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात क्रीडांगण परिसरात ग्रामीण गावाचा देखावा उभारण्यात येईल. त्यासोबत शेती लागवड,भाजीपाला लागवड,वीटभट्टी यांचे प्रात्यक्षिक देखावे उभारले जातील. राज्य स्तरीय कब्बडी स्पर्धा,वारकरी सांप्रदायासाठी भजन कीर्तन कार्यक्रम ,आगरी भोजन यांची रेलचेल या महोत्सवात असणार आहे अशी माहिती विशुभाऊ म्हात्रे यांनी यावेळी दिली आहे .
कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी भव्य पालखी सोहळा ,वारकरी रिंगण सोहळा होणार असून या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील, शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांसह राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, क्रीडा,शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत