भाईंदरमध्ये राष्ट्रीय परिषद धर्मादेश २०२४ चे आयोजन 

By धीरज परब | Published: March 2, 2024 08:17 PM2024-03-02T20:17:08+5:302024-03-02T20:18:26+5:30

भाईंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथे शनिवार  २ मार्च  रोजी करण्यात आले आहे.

organized national conference dharmadesh 2024 in bhayandar | भाईंदरमध्ये राष्ट्रीय परिषद धर्मादेश २०२४ चे आयोजन 

भाईंदरमध्ये राष्ट्रीय परिषद धर्मादेश २०२४ चे आयोजन 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय संत समिती द्वारा राष्ट्रीय परिषद धर्मादेश २०२४ चे आयोजन भाईंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथे शनिवार  २ मार्च  रोजी करण्यात आले आहे.

सदर राष्ट्रीय परिषदेची सांगता रविवार ३ मार्च रोजी होणार आहे . ह्या परिषदेत  जगद्गुरू शंकराचार्य स्वामी ज्ञानानंद तीर्थ, जगद्गुरू रामानंदाचार्या राम्राजेश्वाराचार्य,  आचार्य महामंडलेश्वर निर्वाण पीठाधीश्वर स्वामी विशोकानन्द भारती, आचार्य महामंडलेश्वर अटल पीठाधीश्वर स्वामी विश्वात्मानन्द सरस्वती, आचार्य महामंडलेश्वर आनन्द पीठाधीश्वर स्वामी बालकानन्द गिरी, जगद्गुरू प्रेरणा पीठाधीश्वर ज्ञानेश्वर देवाचार्य , अखिल भारतीय अखाडा परिषद अध्यक्ष  श्रीमहन्त रविंद्रपुरी, अखिल भारतीय अखाडा परिषदचे महामंत्री श्रीमहन्त राजेन्द्रदास, जगद्गुरू खोजीद्वाराचार्य रामऋछपाल, नया उदासीन पंचायती अखाडा अध्यक्ष श्रीमहंत धुनीदास , महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानन्द गिरी , महंत ज्ञानदेव सिंह,  जगद्गुरू शंकराचार्य ज्योतिष्पीठाधीश्वर स्वामी वासुदेवानंद सरस्वती , जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी वासुदेवाचार्य विद्याभाष्कर आदी ४२  शंकराचार्य,  पिठाधिपती ,  महाराज - साधू  यांचा सहभाग आहे .

ह्या दोन दिवसीय शिबिराचे उदघाटन दीप प्रज्वलित  करून करण्यात आले . यावेळी आमदार गीता भरत जैन यांनी उपस्थितांचे स्मृतिचिन्ह , पुष्प देऊन स्वागत केले .

 

Web Title: organized national conference dharmadesh 2024 in bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.